दीपावलीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितेयेपर्यंत म्हणजे पाच दिवस साजरा करतात. यात धनत्रयोदशी , नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो. दिवाळीच्या सणाला लहान मुले मातीचे किल्ले करण्यात दंग असतात. घरातील स्त्रिया दिवाळीच्या आधी दोन / चार दिवसापासून फराळाचे पदार्थ बनविण्यात दंग असतात. प्रत्येकाच्या घरात फराळांच्या पदार्थांचा , उटणे , वासाचे तेल ह्यांचे सुगंध दरवळत असतात. घरासमोर अंगणात रांगोळ्या काढल्या जातात.
हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणाला फटाक्यांची प्रचंड प्रमाणात मागणी असते. आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहिती नसते की फटाके कारखान्यात कसे बनतात. तामिळनाडू मधील शिवकाशी हे फटाका उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.शिवकाशी येथील अनेक उद्योग समूह भारतीय सैन्यास दारुगोळा पुरवत असतात. फाटाक्यांचे बहुतांश कारखाने हे कोलकाता आणि अहमदाबाद च्या सिलिगुडी आणि चंपाहाती या भागातही आहेत. त्या भागातील महिला व मुलांना जगण्यासाठी पैसे कमावण्याचा फटाका कारखान्यात काम करणे हा एकमेव पर्याय आहे. पण फटाक्यात वापरल्या जाणाऱ्या दारूमुळे या लहान मुलांना खूप कमी वयातच श्वसनाचे आजार जडतात.
खालील फोटो दर्शवतात की फटाके कसे तयार होतात. हे फोटो पाहिल्यांनातरही तुम्ही या वर्षी फटाके उडवणार का?
फटाक्यांमध्ये दारू भरताना महिलेचे हाथ पूर्णपणे दारूने भरून गेले आहेत. हा फोटो सिलिगुडीमधील एका फटाक्याच्या कारखान्यामधील आहे.
चंपाहाती येथील एका फटाके कारखान्यात एक कामगार फटाक्यांमध्ये दारू भरताना.
चंपाहाती येथील एका फटाके कारखान्यात एक कामगार फटाक्यांसाठी दारू बनवताना. हा फोटो 2009 साली घेतलेला आहे.
या फोटोत पाहू शकता हे कामगार कसल्याही सुरक्षा उपकरणांशिवाय कारखान्यात काम करत असतात.
खूप तोडक्या पैशांसाठी हे कामगार आपले जीवन धोक्यात घालत असतात. फोटोमध्ये काही महिला फटाक्यामध्ये दारु भरताना दिसत आहे.
प्रकाश आणि ध्वनी यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवायचा प्रयत्न आपण फटाक्यामधून करत असतो. पब हे दृश्य बघून तुम्हाला फटाके उडवावे का नाही हा प्रश्न पडेल.
दिवाळीला फटाके विकणे विक्री करणे ही सामान्य गोष्ट आहे. पण फटाके बनवताना कामगारांचा संघर्ष ही लक्षात घेऊन आपण दिवाळी साजरी केली पाहिजे.
असुरक्षित फटका व्यवसाय हा कामगारांसाठी जीवघेणा ठरत आहे. खासकरून फटाका कारखान्यात स्फोट होऊन मारणाऱ्यांची संख्या फार वाढलीये.
सरकार फटाके कारखान्यांना लायसन्स तर देते पण हे कधीच तपासले जात नाही की फटाके बनवणारे कामगार प्रशिक्षित आहेत का? कारखान्यात त्यांच्या सुरक्षेसाठी काही खबरदारी चे उपाय केलेले आहेत का?
फटाके कारखान्यात थोडासा निष्काळजीपणा अनेक गरीब कामगारांच्या जीवावर बेततो.
भारतात योग्य दळणवळण सुविधा नसल्यामुळे भारत फटाके निर्यात करत नाही. फटाका आयात करणारे देश कठोर नियामक मानक लादतात जे भारत पूर्ण करण्यास असमर्थ आहे. म्हणून अशा प्रकारे जीव धोक्यात घालून भारतात फटाके निर्मिती केली जाते.
भारतात फटाक्यामध्ये पोटॅशियम क्लोरेट वापरले जाते. पण भारतात बेकायदेशीरपणे क्लोरेट वापरून फटाके बनवले जातात.
भारतापेक्षा मोठ्या प्रमाणात फटाके चीनमध्ये बनवले जातात. भारतीय फटाका उद्योग जगातील दुसरा सर्वात मोठा फटाका उद्योग आहे.
फटक्यांमध्ये दारू भरताना कामगार दिसत आहे.
फटाके बनवताना कामगार त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क घालून काम करत असतात.
29 ऑक्टोबर 2007 रोजी शीलगुडी येथे कारखान्यात फटाके वाजवून तपासताना कामगार.
25 वर्षीय नूरजहान बीबी शिलगुडी येथील कारखान्यात फटाके बनवताना.
38 वर्षीय चीकोन सिंग दारूने भरलेल्या हातांनी मास्क व्यवस्थित करताना.
29 ऑक्टोबर 2007 रोजी शीलगुडी येथे कारखान्यात कामगार फटाक्यांमध्ये दारू भरताना.
40 वर्षीय बंटू मोहम्मद शीलगुडी येथे कारखान्यात फटाक्यांमध्ये दारू भरताना.
29 ऑक्टोबर 2007 रोजी शीलगुडी येथे कारखान्यात काम करताना कामगार.
29 ऑक्टोबर 2007 रोजी शीलगुडी येथे कारखान्यात काम करताना कामगार.
29 ऑक्टोबर 2007 रोजी शीलगुडी येथे कारखान्यात काम करताना कामगार.
फटाका कामगारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या NGO सोबत कामगारांच्या मुलांना श्वसनाचे रोग होतात त्याविरुद्ध हे पत्रक दाखवणारी चिमुरडी.

जाणून घ्या भारतीय फटाका उद्योगाबाबत काही अपरिचित माहिती…
जाणून घ्या दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.