क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटमध्ये घडलेले प्रत्येक ऐतिहासिक क्षण खूप महत्त्वाचे असतात. आज आम्ही असेच काही खास ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण
1. सचिन तेंडुलकर ची शेवटची इंनिग-
वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबई येथे सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला. वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकर जेव्हा फलंदाजीसाठी पॅव्हेलिअन मधून बाहेर पडत होता त्या वेळेस जल्लोष करताना प्रेक्षक.
2. अनिल कुंबळेने घेतलेल्या 10 विकेट-
दिल्ली येथे फिरोजशहा कोटला मैदानावर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात अनिल कुंबळेने 10 विकेट्स घेऊन विश्वविक्रम नोंदवला.
3. श्रीलंकेत आलेल्या त्सुनामीने झालेली गाले स्टेडियम ची दुरावस्था-
26 डिसेंबर 2004 ला झालेल्या भयंकर भूकंपामुळे श्रीलंकेत त्सुनामी ने प्रचंड नुकसान झाले होते. या त्सुनामी मध्ये गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ची प्रचंड दुरवस्था झाली.
4. युवराजचे सहा षटकार –
2007 साली झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत वि इंग्लंड सामन्यात युवराज सिंग आणि एंन्ड्रु फ्लिंटॉफ यांच्यात वाद झाला. या वादानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉड ला एका ओव्हरमध्ये 6 षटकार लगावले.
5. 1983 साली ज्यावेळेस भारताने जिंकला पहिला विश्वचषक-
जिम्मी अमरनाथ यांनी वेस्ट इंडिज ची शेवटची विकेट घेताच मैदानात झालेला जल्लोष.
6. दादांच फ्लिंटॉफला प्रतिउत्तर-
फ्लिंटॉफने शर्ट काढून केलेल्या विजयाच्या जल्लोषाला सौरव गांगुलीने 6 महिन्यांनी लोर्ड्स मैदानावर इंग्लंडला हरवल्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये शर्ट काढून केलेला जल्लोष.
7. मधमाश्यांनी केला मैदानात प्रवेश-
फिरोजशहा कोटला मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये चालू असलेल्या सामन्यात मधमाश्यांनी मैदानात प्रवेश केला. यावेळी मैदानातील सर्व खेळाडु जमिनीवर झोपले होते.
8. 434 चे लक्ष आणि 438 रण बनवून आफ्रिकेने मिळवलेला विजय-
ऑस्ट्रेलिया ने साऊथ आफ्रिका ला 434 धावांचा लक्ष दिले होते. पण जेव्हा आफ्रिकेने 438 धावा काढून ऑस्ट्रेलिया वर विजय मिळवला. या विजयानंतर आफ्रिकेने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे मनं जिंकली होती.
9. हेडिंग्ले ची 1983 ची टेस्ट मॅच-
1983 साली झालेल्या एका टेस्ट मॅच दरम्यान सर्व खेळाडू चहा पिट असल्याचा क्षण.
10. खेळाडूंचा एक सेल्फी-
लोर्ड्स मैदानाचे 200 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काढलेला एक सेल्फी.
11. डेव्हीस शेफर्ड यांचा हिप हॉप आणि उडी-
ज्यावेळेस मॅचमध्ये 111 स्कोर होतो त्यावेळेस सर्वांना डेव्हीस शेफर्ड यांची आठवण येते.
12. 1975 साली झालेल्या विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यानंतर ट्रॉफी घेऊन पोज दिलेले क्लाइव लॉइड.
13. क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागून मृत्यू पावलेल्या फिलिप ह्युजेस ला स्मिथने शतक करून श्रद्धांजली वाहिली.
14. ट्रेवर चैपल यांचा अंडरआर्म बॉल-
न्यूझीलंड ला शेवटच्या बॉल ला विजयासाठी 1 धावेची आवश्यकता असताना ट्रेवर चैपल यांनी अंडरआर्म बॉल टाकला.
15. सर डॉन ब्रेडमन यांचे ऐव्हरेज 100 होण्यास थोडक्यात हुकले-
रिटायर होण्याच्या अगोदर शेवटचा सामना खेळत असलेल्या सर डॉन ब्रेडमन यांना 100 चे ऐव्हरेज होण्यास फक्त 4 धावांची आवश्यकता असताना ते बाद झाले. त्यामुळे त्यांचे ऐव्हरेज 99.94 राहिले.
16. ऐलन डोनाल्ड यांचे डायमंड डक-
फायनलमध्ये जाण्यासाठी विजयाची आवश्यकता असलेल्या या सामन्यात ऐलन डोनाल्ड हे लान्स क्लुजनर यांचा आवाज न ऐकताच धावले व धावबाद झाले.
17. वादानंतर उगरलेली बॅट-
एका शाब्दिक चकमकीनंतर जावेद मियादाद यांनी डेनिस लिली यांच्यावर आपली बॅट उगारली होती.
18. दोन फलंदाजांची धडक-
रण काढण्यासाठी धावलेले वेस्ट इंडिज शिवनारायन चंद्रपॉल आणि रिडली जेकब हे गंभीर जखमी झाले होते.
19. स्लिपला ठेवले नऊ खेळाडू-
न्यूझीलंड च्या मॅच च्या वेळेस डेनिस लिली यांनी स्लिप मध्ये चक्क 9 खेळाडूंना ठेवले होते.
20. 1999 च्या झिम्बाब्वे मधील एका क्रिकेट सामन्यातील क्षण-
21. टेस्ट सामन्यात 400 धावा केल्यानंतर मैदानाला ब्रायन लाराने केलेले चुंबन-
22. 1992 साली सुपरमॅन म्हणून ओळख असलेले जोंटी रोड्स यांनी इंझमाम उल हक यांचा उडवलेला स्टँप-
23. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिनने मैदानाला शेवटी अलविदा केले तो क्षण-
24. सलग तिसऱ्या वेळेस ऑस्ट्रेलियाने जिंकला वर्ल्डकप-
1999, 2003 आणि 2007 ला सलग तिसरा विश्वचषक जींकल्यानातर ऑस्ट्रेलियन टीम ने केलेला जल्लोष..
25. एबी डीविलीयर्स ला ख्रिस गेलने केला वाकून नमस्कार-
26. आपला आदर्श मानणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ला वाकून नमस्कार करताना युवराज सिंह-
27. आपल्या खेळासाठी टोनी ग्रेग यांना वाहिलेली श्रद्धांजली-
28. 2011 साली झालेल्या विश्वचषकामध्ये झालेला भारताचा विजय-
29. यांनी खेळ बनवला होता-
30. मॅच हरल्यानंतर नाराज होऊन मैदानात बसलेल्या ब्रेटलीचा उत्साह वाढविताना फ्लिंटॉफ-
31. बोटाला जखम झाल्यानंतरही फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन स्मिथ-
32. गुंडाप्पा ने जेव्हा शतक ठोकले होते त्या वेळेस टोनी ग्रेग यांनी त्याना कडेला उचलुन घेतले होते.
33. ऍल्युमिनियम च्या बॅटने खेळण्यास आलेल्या डेनिस लिली यांच्यावर माईक ब्रीयरले ने नाराजी व्यक्त केली.
34. जबडा तुटलेला असतानाही बॉलिंग करताना अनिल कुंबळे.
35. 1996 च्या वर्ल्डकपमध्ये अमीर सोहेल ने व्यंकटेश प्रसाद यांची मजाक उडवली
प्रसाद यांनी पुढच्याच बॉलवर अमिरचा स्टंप उडवला.
36. सचिनचे 100 वे शतक.
37. 2009 साली पाकिस्तान मध्ये खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंका संघावर गोळीबार झाला होता.या गोळीबारानंतर खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर थेट मैदानात उतरले होते.
38. 4 ऑगस्ट 1976 ला खेळला गेलेला महिलांचा पहिला सामना.
39. 1981 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद 149 धावांची पारी खेळल्याल्यानंतर स्मोकिंग करताना इयान बॉथम.
40. भारताच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूपैकी असलेल्या एकनाथ शोलकर यांनी एलन नॉट यांचा घेतलेला जबरदस्त झेल.
41. बर्म्युडा चा खेळाडू डेवीण लिव्हरकुक ने रॉबिन उथप्पा चा सर्वोत्कृष्ट झेल.
42. क्रिकेटचे देव
सर डॉन ब्रॅडमन च्या पुतळ्यासमोर उभा असलेला सचिन तेंडुलकर.
फोटो आणि माहिती आवडली तर अवश्य शेअर करा.
तुम्ही अनेक वेळेस टि शर्टवर यांचा फोटो बघितला असेल, जाणुन घ्या या क्रांतिकारी व्यक्तिमत्वा बद्दल..
Comments 2