देवांचे देव महादेव , भोलेनाथ, शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ या नावाने ही ओळखले जातात. महादेव हे भारतीय धर्माचे प्रमुख देवता म्हणूनही ओळखले जातात. ब्रह्म विष्णू सोबत त्यांना त्रिदेव म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण ऐकतो की गळ्यात सापांचा वेढा, तर लगेच आपल्या समोर महादेवाचं रूप उभं राहतं. हे स्पष्टपणे दर्शवते की ते एक महान शक्ती आहेत. वाघाची त्वचा परिधान करून तांडव करणारे महादेव हे हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली देव आहेत, ज्यांनी विश्वाची निर्मिती आणि सरंक्षण केले आहे. अनेक देवी देवतांबद्दल पुराणिक कथा आणि गूढ गोष्टी ऐकण्यात आल्या आहेत, ज्या की आपल्यापैकी काहींना माहितीही नाहीत.
आज आम्ही तुम्हाला महादेवांच्या एका अशा मंदिराबद्दल माहिती देणार आहोत, जिथे शिवलिंगाचा रंग हा दिवसातून 3 वेळा बदलतो. होय, तुम्ही जे वाचलंय ते बरोबर वाचलंय. वैज्ञानिकांही हे ऐकून धक्काच बसला आहे. चला तर मग जाणून घेऊया हा शिवलिंगाविषयी :
मंदिराची गूढ कथा-
राजस्थानातील धुळपुरमधील अचलेश्वर महादेव मंदिरातील हे शिवलिंग दिवसातून 3 वेळा रंग बदलते. विश्वास नाही बसत ना? वाचा पुढे.
अविवाहित लोकं देतात मंदिराला भेट-
असे मानले जाते की ज्या अविवाहित पुरुष आणि स्त्रियांना विवाहासाठी अपेक्षित जोडीदार मिळण्यास अडचणी येत आहेत किंवा लग्नासंबंधित इतर समस्या आहेत असे लोक या मंदिरात प्रभू शिवचे दर्शन घेण्यासाठी येतात.
मंदिरात केली जाते प्रभू शिव यांच्या पायांच्या बोटांची पूजा-
या मंदिराची अजून एक आकर्षण व सुंदरता म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात जो नंदी आहे तो पूर्णपणे पितळाचा बनलेला आहे.
पायांच्या बोटांची पूजा करण्याचे महत्व तुम्हाला माहिती आहे का?
हे मंदिर 2500 वर्षे जुने असल्याचे बोलले जाते. असे मानले जाते की इथे पूजा केले जाणारे बोटं हे जगाला क्रमात ठेवते. असेही बोलले जाते की तिथे जे महादेवाच्या बोटाचे ठसे आहेत ते त्यांचे स्वतःचे खरोखरंचे आहेत.
हेच ते शिवलिंग आहे ज्याचा रंग बदलतो-
शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, हे सर्व सूर्यप्रकाशामूळे होते, पण या बातमीची पुष्टी करणारे कोणतेही सौर्स नाहीयेत. संपुर्ण देशभरातील भक्त या अनोख्या अनुभवासाठी मंदिरास भेट देत असतात.
या कारणांमुळे वैधानिक ही गोंधळलेले आहेत-
आपण उपलब्ध स्रोतांना खरे मानले तरीही कोणीच सांगू शकत नाही की या शिवलिंगाचा उदय कसा झाला. या सर्व गोष्टीमुळे शास्त्रज्ञ ही गोंधळात पडले आहेत.
या शिवलिंगाच्या दिव्य शक्तीबद्दल ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
भगवान शंकराच्या दैवी सामर्थ्य आणि शक्तीमुळे या मंदिरात मागितलेल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे भक्तांच म्हणणे आहे.
या शिवलिंगाची संकल्पना ही पूर्णपणे वेगळी आहे.
सर्वतोपरी प्रयत्न करूनही या शिवलिंगाचा उदय कसा झाला याचा शोध कोणीही लावू शकले नाही. अजून एक रंजक गोष्ट म्हणजे, बोलले जाते की या शिवलिंगाचा शेवट शोधण्यासाठी भक्तांनी पूर्ण आसपासचा परिसर खोदला होता तरीही शेवट सापडला नाही.
माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा.