13 जून 1992 ला उत्तराखंड मधील पितोरागढ ला दिशा चा जन्म झाला. दिशाचे वडील हे एक डीएसपी ऑफिसर आहेत. दिशाला खुशबू नावाची एक मोठी बहीण ही आहे.
दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. 2013 साली झालेल्या पोंड्स फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये ती उपविजेती ठरली. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीची ओळख बनली. दिशाने कॅटबरी डेअरी मिल्क च्या जाहिरातीत ही काम केले आहे.
दिशा ने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2015 साली साऊथचे सुप्रसिद्ध डायरेक्टर पुरी जगन्नाथ यांच्या लोफर या चित्रपटाद्वारे केली. ज्यामध्ये तिने वरून तेज सोबत एका हैदराबादी मुलीची भूमिका साकारली होती.2016 साली दिशाच्या करिअरला कलाटणी मिळाली. दिशाला ‘एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची नामी संधी मिळाली. या चित्रपटात तिने धोनीची पहिली प्रेमिका प्रियांका ची भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला होता. पुढे दिशाला ‘एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील अभिनयासाठी बेस्ट डेब्यु अवॉर्ड ही मिळाला.
2012 मध्ये आपले खरे वय लपवले म्हणून दिशा चर्चेत आली होती. तिने एका इंटरव्ह्यूमध्ये आपली जन्मतारीख 13 जून 1992 सांगितली होती व नंतर च्या काळात तिने आपली जन्मतारीख 27 जुलै 1995 सांगितली. या तारखेची अजून पुष्टी झालेली नसली तरी दिशा ही बॉलीवूड मधील सर्वात तरुण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
जाणून घेऊया दिशाबद्दल काही रंजक गोष्टी-
1. रणबीर कपूर हा दिशाचा आवडता अभिनेता आहे.
2. दिशाला गाडी चालवायला फार आवडते. ति मित्रांसोबत गाडी चालवताना नेहमी नजरेस पडते.
3.अलीकडेच तिच्या आणि टायगर श्रॉफ च्या अफेअर संबंधी बातम्या ही प्रसारित झाल्या होत्या. बोलले जाते की टायगर श्रॉफ तिला बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी मदत करत आहे.
4. बागी चित्रपटासाठी टायगर श्रॉफ ची दिशा ही पहिली पसंती होती. परंतु नंतर निर्मात्यांनी तिच्या ऐवजी श्रद्धा कपूर ला चित्रपटात संधी दिली.
5. दिशा पटणीने आपल्या छोट्याशा करिअर मध्येच प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅन यांच्या सोबतही काम केले आहे.
6. दिशाचे पटणीचे वडील एक पोलीस अधिकारी आहेत, तर तिची आई गृहिणी आहेत. दिशाला दोन मोठ्या बहिणी व एक धाकटा भाऊ आहे.
7. दिशाने अमिटी युनिव्हर्सिटी लखनऊ मधून बी टेक कॉम्प्युटर सायन्स चे शिक्षण पूर्ण केले आहे.
8.धोनीच्या बायोपिक साठी तिने झारखंडची एक आदिवासी भाषा ही शिकली आहे.
9. दिशा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ हे ओडिसाच्या एकाच ट्रेनर कडून ट्रेनिंग घेतात.
10. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही नसेल की दिशाने इंपिरियल ब्लु च्या जाहिरातीतही काम केलेले आहे.
11. चित्रपटात दिसण्यापूर्वी तिने गार्नियर, डेअरी मिल्क, स्नॅपडील आणि एअरसेल च्या जाहिरातीमध्ये ही अभिनय केला आहे.
12. 2015 मध्ये तिला तेलगू मध्ये पुरी जगन्नाथ दिग्दर्शित वरून तेजच्या लोफर चित्रपटात ब्रेक मिळाला.