Friday, August 12, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र विषयी उत्तम लेख नक्की वाचा…

khaasre by khaasre
October 7, 2017
in बातम्या
0
शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र विषयी उत्तम लेख नक्की वाचा…

मराठा आरमार दिन

“शिवाजी महाराज” म्हणजे असे व्यक्तीमहत्व, जे ३५० वर्षे ओलांडून गेली तरीही पूर्णपणे उलघडत नाही. आपण महाराजांचा पराक्रम अगदी बऱ्यापैकी जाणून आहोत. काही इतिहासकारांनी तर ते अतिशय योग्य प्रकारे म्हणजे अगदी विश्लेशणात्मक मांडले आहे, अगदी तोरणा जिंकल्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत असंख्य अशा लढाया आपन पाहील्या ज्यामध्ये आपण महाराजांचा पराक्रम, राजकारण, मुत्सदीपना अशा अनेक गुणांचा अभ्यास केला.

साहजिकच, ज्या घराण्यात महाराज जन्माला आले ते घराणे म्हणजे एक पराक्रमी घराणे आणि त्यामध्ये जिजाऊसाहेबांचे संस्कार आणि शिकवण आणि शहाजी महाराजसाहेबांसारखा गुरुमय पिता, एक माणूस जो गडावरच जन्मला आणि सह्याद्रीच्या कुशीत खेळला आणि हाच लहानपणीचा खेळ बघता बघता इतका मोठा झाला की गगनाला भिडला. महाराजांनी सह्याद्रीत जे काही एक स्वतंत्र राज्य घडविले ते नक्कीच विशेष होते कारण भूगोलाचा आभ्यास, इतिहासाचा अभ्यास, वर्तमानाची जाण, योग्य ते नियोजन आणि माणसांची योग्य ती परख आता यावर खूप काही वाचून झाले आहे. बोलून झाले आहे, बऱ्यापैकी अभ्यास पण झाला आहे.

painting by parag ghalsasi

असंच एक दिवशी आमचे अजयदादा जाधवराव यांच्याशी फोनवर इतिहासावर गप्पा मारत होतो, त्यामध्ये एक विषय झाला तो म्हणजे “शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र” (Shivaji Maharaj and ocean Technology).

आपण आजवर जो इतिहास वाचला किंवा ऐकला त्यामध्ये आपण “महाराजांचे आरमार” हा विषय मला वाटतंय जरा कमी आभ्यासला आहे, कारण आम्हाला महाराज किल्ल्यावरच पाहिजेत परंतु आम्ही एका गोष्टीचा विचार नाही करत, तो म्हणजे नेहमी डोंगरदऱ्यात फिरणारा माणूस, गडकिल्ल्यात विशेष रुची असणारा माणूस “समुद्र” या विषयाकडे कसा वळला असेल ? आणि का वळला असेल ?

वाचा व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज या घटनेमागील सत्य

आता याचे ही उत्तर बऱ्याच जणांनी दिले आहे त्यामध्ये सगळ्यांना माहित असलेले वाक्य म्हणजे
“आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच. जैसे ज्यास अश्वदल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र”. सत्य आहे, पण हा विचार मनामध्ये कसा आला असावा ? आणि मग याची तयारी कशी केली असावी ? हा विषय जरा महत्वाचा.

१६५६ नंतर महाराजांनी भिवंडी-कल्याण जिंकले आणि जवळ-जवळ वयाच्या पंचविशीनंतर महाराजांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला असावा, महाराजांच्या सुरवातीच्या २०-२५ वर्षांच्या कालखंडात त्यांचा समुद्राशी संपर्क आला असावा असे वाटत नाही. आता यामध्ये दोन गोष्टी ज्या मला मांडाव्या वाटतात. “आरमार म्हणजे स्वतंत्र येक राज्यांगच. जैसे ज्यास अश्वदल त्याची पृथ्वी प्रजा आहे. तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र”. हे जाणून महाराजांनी समुद्र किनारपट्टीकडे लक्ष्य दिले असावे किंवा भिवंडी-कल्याण जिंकल्यानंतर समुद्र, आरमार आणि त्याचे महत्व ही कल्पना महाराजांच्या डोक्यात आली असावी.
या दोनीपैकी एक काहीतरी नक्कीच होते.

महाराजांना सह्याद्री आणि त्याचे महत्व हे काय १-२ वर्ष्यात कळलेले नसावे, किंवा अगदी लहानवयात म्हणजे ४-५ वर्ष्यांचे असतानाच त्याना सह्याद्री म्हणजे काय याचा आभ्यास नसावा, कळते झाल्यावर ज्यावेळी सह्याद्रीत फिरू लागले त्यावेळी सह्याद्री त्यांचा जवळचा मित्र झाला असणार म्हणजे महाराजांनी सह्याद्री या विषयाचा विशेष अभ्यास केला असावा आणि मग घौडदौड सुरु केली असावी.

सांगायचं एकच की कोणत्याही गोष्टीचा स्वतः पहिला अभ्यास करणे मग पुढची सूत्र मांडणे हा गुण महाराजांचा आपल्याला इथे दिसतो.
“The secret of the man who is universally interesting is that he is universally interested.”– William Dean Howells

वाचा शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर

“समुद्र”, हा काय सोपा आणि लहान विषय नाही, आजही समुद्र शास्त्र (Ocean Technology) हा एक Phd चा विषय आहे जो खूप मोठा आहे, २१व्या शतकात सुद्धा आज बरीच मोठी जहाज अंदाज चुकल्यामुळे समुद्राच्या तळाला जावून मिळाली ज्यामध्ये शेकडो रुपयांचे नुकसान आणू मनुष्यहानी होते.
जेव्हा समुद्राचा विषय येतो, त्यामध्ये जहाज बांधन आणि त्यात बसून जान हे आहे का? त्यामध्ये बऱ्याच गोष्ठी आहेत जशा “जहाज कसे असावे”, “ते चालवावे कसे”, “कुणी चालवावे”, मग त्याच शिक्षण कसे घ्यावे, “हवामानाचा अभ्यास”, “दिश्यांचा आभ्यास”, “भरती-ओहोटी” ज्यामध्ये खगोलशास्त्र येते. हे विषय महाराजांनी कधी अभ्यासले असावेत आणि कसे अभ्यासले असावेत ? दादोजी सुद्धा नव्हते हो त्यांना शिकवायला. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर,

Technology Groups, Coastal and Environmental Engineering,Energy & Fresh Water, Marine Sensor System, Marine Biotechnology, Ocean Acoustics and Modelling, Ocean Electronics, Offshore Structures

हे सगळे विषय खूप महत्वाचे मग याचा अभ्यास असल्याशिवाय समुद्रात आरमार कसे उभारता येईल ?

अवघ्या १० वर्ष्यात महाराजांनी एवढे मोठ्ठे आरमार उभे केले.
अशा असंख्य गोष्ठी आहेत ज्या आभ्यासायला घेतल्या की वर्ष्यानवर्षे जातात. हे महाराजांनी कसे केले आणि कधी केले असावे.
आणि महाराजांनी याचा आभ्यास पहिला स्वतः केला असणार आणि मग लोकं तयार केली असणार. मुलखावर होणारे सततचे आक्रमण थोपवायचे आणि त्याचबरोबर प्रगतीही करणे आवश्यक. या सर्व गोष्टीतून महाराजांनी कसा आणि कधी वेळ काढला असावा ? आणि “समुद्रशास्त्र” या विषयावर कधी आभ्यास केला असावा याचा अभ्यास आपण करणे गरजेचे आहे.

समुद्रावर सत्ता असावी हे फक्त संरक्षणासाठीच का ? पण महाराजांचा आभ्यास केला तर,

self defense is not an option to save your life, in fact attack is best way to save your life.
म्हणजेच महाराजांचे धोरण नुसते संरक्षण नव्हते, जसे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच हे समुद्रमार्गे आपल्यापर्यंत आले तसे आपण ही त्यांच्यापर्यंत जावू शकतो आणि भविष्यात जावे लागेल हे ही एक कारण आरमार उभारण्याच्या पाठीमागे असू शकते.
दि. 24 ऑक्टोबर 1657 रोजी ऐन दिवाळीत (धनत्रयोदशी) कल्याण, भिवंडी काबीज केली. आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली. यावर्षी या घटनेस 359 वर्षे पूर्ण झालेली आहेत. हि आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
अशा शुभमुहूर्तावर शिवरायांनी आरमाराची उभारणी केली म्हणून ’24 ऑक्टोबर’ हा दिवस ‘मराठा आरमार दिन’ किंवा ‘भारतीय आरमार दिन’ म्हणून आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करूयात.

Prashant Babarao Lavate Patil
Courtesy:-
जागर इतिहासाचा फेसबुक पेज
जागर इतिहासाचा फेसबुक ग्रुप

Loading...
Tags: marathanavy
Previous Post

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

Next Post

लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन जगतोय फुटपाथवर जीवन

Next Post
लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन जगतोय फुटपाथवर जीवन

लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन जगतोय फुटपाथवर जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

What Is Jiffy Trading App, Feature Of Jiffy Trading Apk File

July 15, 2022

Best Gold Loan Bank IN India

July 15, 2022

What Is Win Trade Apps, Features Of Win Trade App

July 15, 2022
सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In