एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिला नेहमीच देशाची सेवा करण्याची इच्छा होती. तिच्या डोक्यात नेहमी एकच विचार, मोठ्या पगाराची नौकरी करण्यापेक्षा वर्दी घालून देशाची सेवा करायची आहे. ती म्हणायची मुलीसुद्धा मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत म्हणून त्यांना सुद्धा सैन्यात जाऊन सेवा करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. चला बघूया खासरे वर त्यांची कहाणी…
पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या देशात त्यांनी त्यांच्या उत्कृष्टतेचा परिचय दिला. त्या आपले जुने दिवस आठवून सांगतात की,पाणी आणि लाईट सारख्या सुविधे साठी अकॅडमी च्या अधिकाऱ्यांकडे विनवणी करावी लागत असे.
१९९२ च्या अगोदर महिलांना भारतीय सैन्यात प्रवेश भेटत नव्हता. यानंतर प्रिया झिंगण यांनी तत्कालीन सेना प्रमुख जनरल सुनीत फ्रान्सिस यांना पत्र लिहून सैन्यात मुलींना सुद्धा प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी आवाज उठवला.
प्रिया ने एका मुलाखतीत सांगितलं की, “मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून मी तात्कालीन सेना प्रमुखांना एक मोठ्ठ पत्र लिहून मुलींना सुध्दा सैन्यात भरती होण्याचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. सैन्याची वर्दी घालणे हे माझं स्वप्न होत.”
त्यांच्या पत्राच उत्तर देताना सेना प्रमुख म्हणाले की,पुढील दोन वर्षात सैन्यात महिला भरतीसाठी ते व्यवस्था करणार आहेत. या गोष्टीने प्रियाला भरपूर उत्साह निर्माण झाला. या नंतर १९९२ मधेच महिलांसाठी सुध्दा सैन्यात भरतीची जाहिरात निघाली. प्रिया ने कठोर मेहनत घेऊन सैन्यात आपली जागा निश्चित केली आणि चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली.
भारतीय सैन्यात जाणारी प्रिया पहिली महिला होती म्हणून त्यांचं इनरॉलमेंट कॅडेट क्रमांक -००१ ठेवण्यात आला. हा ऐतिहासिक क्रमांक प्रिया नेहमीच लक्षात ठेवते. त्यांच्या बॅच मध्ये एकूण २५ महिला होत्या. या बॅच ने देशातील महिलांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा दिली. एक महिला सैन्य अधिकारी म्हणून त्यांनी बरेच अनुभव सांगितले. पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या देशात त्यांनी उत्कृष्टतेचा परिचय दिला. त्या आपले जुने दिवस आठवून सांगतात की,पाणी आणि लाईट सारख्या सुविधे साठी अकॅडमी च्या अधिकाऱ्यांकडे विनवणी करावी लागत असे.
महिला असून त्यांच्याशी कुठलाही महिलासारखा व्यवहार करत नव्हते,पुरुषांच्या कॅडेट प्रमाणे त्यांना ट्रेंनिंग करावी लागत असे. त्या सांगतात की,त्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागत असे,ट्रेंनिंग मध्ये असताना महिला कॅडेट आणि पुरुषांना एकाच पूल मध्ये पाठवलं जात असे. पण याविरुद्ध सगळ्या महिला कॅडेट ने मिळून आवाज उठवला. त्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांचा आदेश बदलावा लागला. त्या असेच प्रत्येक कठीण प्रसंगाना न डगमगता सामोरे जात असत. एकदा एक जवान त्यांच्या खोलीत दारू पिऊन आला,त्यांनी त्या जवानांची तक्रार केली आणि त्यांचं कोर्ट मार्शल केलं गेलं. एक वर्ष ही कठोर ट्रेंनिंग करून ६ मार्च १९९३ ला त्यांना सर्व्हिससाठी घेण्यात आले.
प्रियाने लॉ चे शिक्षण पूर्ण केले होते,पण त्यांच मन सैन्यातील भुसेनेत जाण्याकडे होत.त्यांनी बराच विरोध केला,पण त्यांची नियुक्ती न्यायाधीश ऍडव्होकॅटे जनरल म्हणून करण्यात आली. त्याच वेळेला महिलांसाठी सैन्यातील युध्द भूमीवरच्या जागा रिक्त नव्हत्या. याच वर्षी जून मध्ये सैन्यप्रमुख बिपीन रावत यांनी कॉम्बेट ग्रुप मध्ये महिलांची कुठलीही अट न लावता नियुक्ती केली जाईल अशी घोषणा केली. मिलिटरी पोलीस साठी सुद्धा महिलांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. पण याची सुरुवात २५ वर्षा अगोदर प्रिया आणि त्यांच्यासोबतच्या २५ महिलांनी केली आहे.
आता महिलांना सैन्यात मेडिकस,लीगल,एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग विंग मध्ये प्रवेश दिला जातो. प्रियासाठी एक चांगली आठवण ही आहे की त्यांनी एका व्यक्तीच कोर्ट मार्शल केलं होतं. कोर्ट मार्शल करताना कार्यवाही करणारा अधिकारी एक कर्नल होता. जेव्हा त्यांनी प्रियाला विचारलं की,या आधी तू किती कोर्ट मार्शलची प्रकरण केलीे? ज्याला आपण आता बघणार आहोत. तेव्हा त्यांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला खोटं सांगितलं की, हे माझं सहाव प्रकरण आहे, खरं त्यांचं हे पहिलंच प्रकरण होत. ही खूप गंभीर बाब होती पण प्रियाने हुशारीने काम केले आणि नंतर त्यांनी सांगितलं की हे माझं पहिलंच प्रकरण आहे तेव्हा त्या अधिकाऱ्याला त्यांची प्रसंशा केल्या शिवाय राहवलं नाही.
ह्या साहसी प्रवाहाच्या विरोधात मार्ग निर्माण करणाऱ्या दुर्गेस खासरे तर्फे सलाम…
वाचा सरकारी नौकरी सोडून ती करते अनाथांची सेवा..