लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून 19964 ते 11 जानेवारी 1966 ला त्यांच्या मृत्यूपर्यंत जवळपास 18 महिने ते भारताचे पंतप्रधान होते. या पदावरील त्यांचा कार्यकाळ अद्वितीय होता. शास्त्रीजी आझादीची लढाई लढणारे गांधीवादी नेते होते. जवाहरलाल नेहरूजींचे त्यांच्या कार्यकाळात 27 मे 19964 ला निधन झाल्यानंतर स्वछ प्रतिमेमुळे लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान बनवण्यात आले.
निष्कलंक चारित्र्याच्या शास्त्रीजींची लोकप्रियता 1965 मधल्या युद्धात पाकिस्तान वर विजय मिळवल्यामुळे प्रचंड वाढली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं वर्णन पाश्चात्य देशांनी केलं होतं. 1962 च्या युद्धात चीनकडून भारताचा पराभव झाला होता. भारताची काही भूमी चीनने बळकावली होती.देशाची जगभरात मानहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान चे तेव्हाचे फिल्ड मार्शल अबुखान यांनी युद्धाच्या मार्गानं काश्मीर जिंकण्यासाठी 1965 मध्ये भारताविरुद्ध युद्ध सुरू केलं. अवघ्या आठ दिवसाच्या आत जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरवर पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी झेंडा फडकवेल अशी स्वप्नं अयूबखान आणि त्यांचे तेव्हाचे सहकारी परराष्ट्र मंत्री झुल्फीकार अली भुट्टो पहात होते. प्रत्यक्षात मात्र उलटंच घडलं. शास्त्रीजींनी भारतीय भूमीवर आक्रमण करणार्या पाकिस्तानी लष्कराचा मुकाबला तर करावाच, पण पाकिस्तानी भूमीतही प्रतिआक्रमण करायचा आदेश लष्कराला दिला होता. भारतीय लष्करानं अवघ्या 21 दिवसांच्या त्या युद्धात पाकिस्तानी लष्कराचं कंबरडं मोडलं.
अमेरिकेच्या सेबरजेट या विमानांचा आणि पॅटन रणगाड्यांचा दबदबा संपवला. भारतीय सेना लाहोरच्या दिशेनं कूच करायला लागली.लाहोर च्या वेशीवरचं बर्की हे गावही भारतीय लष्करानं काबीज केलं. त्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा 750 चौरस मैलाचा प्रदेश जिंकला होता तर पाकिस्ताननं भारताचा 225 चौ. किलो मीटर प्रदेश मिळवला होता. भारतीय लष्कराने हाजीपीर खिंडही जिंकलेली होती. त्या विजयानं शास्त्रीजींच्या खंबीर नेतृत्वाची देशात आणि जगभर प्रशंसा झाली होती. पण, रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीनं शास्त्रीजी आणि अयुबखान यांची रशियातल्या ताश्कंदमध्ये जानेवारी 66 मध्ये चर्चा झाली. रशियाच्या दबावानं शास्त्रीजींनी पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत द्यायच्या करारावर सह्या केल्या. ताश्कंद करार या नावानं तो समझोता जाहीर झाला.ताश्कंद मध्ये पाकिस्तान चे राष्ट्रपती आयुब खान यांच्या सोबत युद्ध समाप्त करार केल्या नंतर 11 जानेवारी 1966 ला रात्री त्यांचा गूढ मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री यांच्या गूढ मृत्युबाबतच्या गुप्त फाईली केंद्र सरकारने खुल्या कराव्यात अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतची चर्चा देशभर सुरू राहिली.
जाणून घेऊया त्यांच्या गूढ मृत्यूविषयी काही माहिती..
शास्त्रींना विष देणात आले होते का?
मृत्यूनंतर त्यांचा चेहरा निळा झालेला होता. त्यांच्या कपाळावर पण पांढरे डाग होतें. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अटॅक ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे डाग शक्यतो नसतात. त्यामुळे आजही त्यांच्या मृत्यूबद्दल साशंकता आहे.
काय घडले होते नेमके तुला रात्री?
कुलदीप नय्यर यांनी याबद्दल सर्व माहिती बियोंड द टाइम या पुस्तकात लिहिली आहे. कुलदीप लिहितात, त्या रात्री शास्त्री रात्री 10 वाजता आपल्या खोली मध्ये आले होते.नंतर त्यांनी आपले सेवेकरी रामनाथ यांना जेवण आणण्यास सांगितले. त्यांचं जेवण राजदूत टी एन कौल यांच्या घरून येत असे, जे की खानसामा जान मोहम्मद बनवत असत. त्यादिवशी त्यांनी आलू पालक आणि अजून एक भाजी खालली होती. त्यानंतर त्यांनी दैनदिनी प्रमाणे 1 ग्लास दूध पिले. सकाळी काबुल जाण्यासाठी उठायचं असल्यामुळे त्यांनी जेवणानंतर रामनाथ यांना जाण्यास सांगितले.
नंतर त्या रात्री घडले ते सर्व धक्कादायक होते. लाल बहादूर शास्त्री अचानक आपले खाजगी सचिव जगन्नाथ साहाय्य यांच्या खोलीजवल पोहचले. त्यांनी विचारले ‘डॉक्टर साहाब कहा है’, त्यानंतर त्यांच्या सोबतच्या लोकांनी त्यांना पाणी पाजले व खोलीमध्ये घेऊन गेले. शास्त्रीजी आपल्या बेडवर झोपले.जगन्नाथ यांनी त्यांना पाण्याचा ग्लास दिला व बोलले ‘बाबूजी अब आप पुरी तरच ठीक है’. यांनातर शास्त्रीनी आपल्या छातीवर हाथ फिरवला व ते बेशुद्ध झाले व त्यानंतर ते उठू नाही शकले.
रशियानं शास्त्रीजींच्या पार्थिव देहाची उत्तरीय तपासणी केली नव्हती. केंद्र सरकारने ती केली का नाही हे शेवटपर्यंत समजले नाही. 1977 मध्ये चुग यांचं ट्रकने धडकल्याने निधन झालं तर पुढे रामनाथचाही अपघात झाला. त्यात त्याचे लय गेले आणि त्याची स्मृतीही गेली. त्यामुळे शास्त्रीजींच्या मृत्यूचे गुढ पन्नास वर्षानीही कायम राहिले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या निधनाबद्दल गुप्त फाईली उघड केल्यास ते गुड उलगडेल असं शास्त्रीजींच्या नातेवाईकांना वाटते.
हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा..