भारताला स्वतंत्र करण्यासाठी हजारो-लाखो लोकांनी आपले प्राण दिले,पण त्यातील सर्वांनाच इतिहासाच्या पानात जागा नाही मिळाली. आज आम्ही खासरेवर एका अशा क्रांतिकारी मुलीची गोष्ट सांगणार आहे जिने आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली.
आज पासून जवळपास ८५ वर्षापूर्वी २१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे १९११ साली झाला. ती लहानपणापासून अत्यंत हुशार होती,तिने फिलॉसॉफी विषयामध्ये पदवी प्राप्त केली.तिने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याच गावातील एका शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.पण त्यांना देशासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती,आणि त्या नेहमी झाशीची राणीच्या गोष्टी ऐकत मोठी झाली होत्या.
१९३२ च्या दरम्यान त्या सुर्यसेन यांना भेटल्या.त्यावेळेस सुर्यसेन हे क्रांतिकरकांचे प्रेरणास्थान बनले होते,ब्रिटिशांकडून शस्त्र लुटण्याचे त्यांचे किस्से लोकांच्या ओठावरच होते. सुर्यसेन यांना भेटल्यानंतर त्यानीं आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला,पण त्या महिला असल्या कारणाने त्यांना विरोध सुद्धा करण्यात आला. पण त्यांच्या मनात देशभक्ती उसळत होती. अशाप्रकारे त्या क्रांतिकारी गटातील सदस्य बनल्या. क्रांतिकारी गटात असतांना त्यांनी बरेच कारनामे सुद्धा केले होते जसे-टेलिग्राम ऑफिस वरील हल्ला,रिजर्व पोलिस लाईन ताब्यात घेणे अशा कामात त्या नेहमी पुढे असायच्या.
जलालाबाद येथील क्रांतिकारी हमल्या दरम्यान त्यांनी स्फोटके नेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरच सोपविण्यात आली होती.
हल्ल्यासाठी २३ सप्टेंबर १९३२ हा दिवस ठरवण्यात आला होता. हल्ल्यासाठी निवडलेल्या क्रांतीकारकांना पोटॅशिअम सायनाईड देण्यात आलं होतं कारण कुणीही जिवंत पकडल्या जाऊ नये म्हणून. प्रीतीलताने हल्ल्यासाठी एका पंजाबी माणसा सारखी वेशभूषा केली होती. २३ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता यांनी त्या क्लब वर हल्ला केला. हल्ल्याच्यावेळेस क्लब मध्ये ४० इंग्रज अधिकारी आणि काही इंग्रज पोलीस उपस्थित होते. आग लागल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एक गोळी प्रीतीलता ला लागली,इंग्रजांनी त्यांना घेरले.
पण प्रीतीलता वड्डेदार यांनी एका क्षणाचाही विचार न करता सायनाईड ची गोळी घेतली आणि इंग्रजांना फक्त तिचा मृतदेह मिळाला. अशा प्रकारे फक्त २१व्या वर्षी अद्वितीय साहस दाखवत या भारत मातेच्या वीर मुलीने देशासाठी बलिदान दिले.
अभिमानाने शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा शहीद भगतसिंगयांच्या विषयी अपरचीत गोष्टी…