Saturday, August 6, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

महाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या…

khaasre by khaasre
September 29, 2017
in बातम्या
0

महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जिथे उत्तम समुद्रकिनारा, पर्वत व अद्भुत स्वादिष्ट अन्न आणि या सर्वामध्ये विविधता आढळते. आठवड्याचे शेवटचे दिवस येत आहे आपली प्लानिंग सुरुच असेल तर आम्ही तुम्हाला खासरे वर काही पर्याय उपलब्ध करून देत आहो. जेथे एका दिवसाचा प्रवास करून आपण परत कामाला सोमवारी जाऊ शकता…

पाच‍गणी

पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक खंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.

माळशेज घाट

माळशेज घाट हा नगर-कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावं असं वाटणं साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.

माळशेज घाट मुंबई-पुण्यापासून जवळच आहे. कल्याणहून 86 कि.मी.चा टप्पा दीड-दोन तासात संपतो. कल्याणहून बससेवा उपलब्ध आहे. या स्थळाची लोकप्रियता पाहता परदेशी पर्यटक मुंबईत उतरल्यावर व्यस्त जीवनशैली टाकून सरळ विश्रंतीसाठी माळशेज घाटाकडे वळतात. त्यामुळे मुंबई विमानतळापासून तिथे जाण्यासाठी टॅक्सी सहज मिळते. एकदा काय माळशेज परिसरात आलं की उंचच उंच गिरीशिखरं दिसतात. सर्वात प्रथम मनात भरतो तो इथला हरिश्चंद्र गड. पावसाळ्यात येथे डोंगरातून झरे लागलेले दिसतात. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून दुडूदुडू वाहणारे खटय़ाळ झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे.

कामशेत

कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींग व ट्रेकींगचा थरार अनुभवू शकता.

अलिबाग

लिबाग शहर समुद्रकिनार्‍याला लागून आहे. हे शहर मुंबईला लागून आहे. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे.

अलिबागच्या समुद्रकिनार्‍यांशिवाय किहीम, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत. कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत.

दापोली

दापोली केंद्रस्थानी ठेवून सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य आहे. ‘वीकएंड’ला या सर्व स्थळांना भेट देऊन परत मुक्कामी परतता येते. अलीकडे प्रत्येक वीकएंडला दापोलीत येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दापोलीचा पर्यटनाचा हंगाम हा बाराही महिने असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील अनेक ठिकाणे आता पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित होत आहेत.

निसर्गाने बहाल केलेले असीम सृष्टिसौंदर्य, स्वच्छ व मनमोहक विस्तीर्ण समुद्रकिनारे, तालुक्यातील ऐतिहासिक बंदरे, आंजल्र्यातील कडय़ावरचा गणपती, आसूदचे केशवराज व व्याघ्रेश्वर देवस्थान, दाभोळचे चंडिकामंदिर, केळशीतील स्वयंभू महालक्ष्मी मंदिर व याकूबबाबा सरवरी यांचा दर्गा अशी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू यांमुळे दापोली तालुका पर्यटकांच्या आक र्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर थंड, प्रसन्न हवेमुळे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून असलेली ओळख यामुळे पर्यटकांना दापोली अधिकच भुरळ पाडत आहे.

दिवेआगार

दिवेआगर हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. एकदा दिवेआगर ला भेट देवूनही मन भरला नाही म्हणून परत सगळं अनुभवण्यासाठी,समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी,लहान पण सुबक मंदिरांच दर्शन’ घेण्यासाठी व कोकण मेवा खाण्यासाठी एका वीकेंडला पुन्हा एकदा पाय दिवेआगर कडे वळले.. दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्‍याजवळ पोचतो.

कास पठार

कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.

कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे संकेतस्थळ आहे.

लोणार सरोवर

पृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय, अद‍्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्या अशनीपातात पृथ्वीतलावर चार विवरे तयार झाली. त्यामध्ये अॅरिझोना (अमेरिका), ओडेसा (अमेरिका), बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवर अग्नीजन्य खडकातील लोणार हे सध्याचे एकमेव विवर आहे.

निघोज रांजणखळगे

आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते.

पावसाळयात खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती.

माथेरान

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.

लोणावळा

लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.

चला मग करा प्लानिंग फिरायची 🙂

Loading...
Tags: maharashtraplacestourist
Previous Post

अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे कोडवर्ड तुम्हाला माहिती आहे का ?

Next Post

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

Next Post
जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

What Is Jiffy Trading App, Feature Of Jiffy Trading Apk File

July 15, 2022

Best Gold Loan Bank IN India

July 15, 2022

What Is Win Trade Apps, Features Of Win Trade App

July 15, 2022
सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In