संपूर्ण जगभरात माफिया डॉन त्यांच्या रोजच्या व्यवसायात कोडवर्ड वापरत असतात.सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी कोडवर्ड ची भली मोठी लिस्टच डि-कंपनी ने बनवलेली आहे.
पूर्वीच्या काळात अंडरवर्ल्ड मध्ये खोका आणि पेटी हे प्रचलित शब्द होते. काळ बदलला तसा शब्द ही बदलत गेलेत.जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात हे कोडवर्ड खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात.
जाणून घेऊया सध्याच्या काळात वापरले जाणारे काही प्रचलित कोडवर्ड खासरे वर बघुया…
1.फाईल-
दैनंदिन जिवनात फाईल म्हणजे कागदपत्रे ठेवण्याची वस्तु परंतु अंडरवर्ल्डचे शब्दच वेगळे त्यांच्या भाषेत फाईल म्हणजे हत्यार होतो.फाईल लाओ म्हटल की समजायच हत्यार येणार. फाईल हा अंडरवर्ल्ड मध्ये सर्रासपणे वापरला जाणारा एक महत्वाचा शब्द मानला जातो.
2.पेशंट-
हा शब्द वाचताच आपल्या डोक्यात विचार येतो तो दवाखाना आणि आजारपणाचा. पण पेशंट हा दाऊद चा सर्वात मोठा शत्रू होता. एकेकाळी दाऊद चा जिगरी दोस्त असणारा मुंबईचा डॉन छोटा राजन नंतरच्या काळात दाऊदचा कट्टर दुश्मन बनला. या दुष्मनीमुळे दाऊद ने नंतर छोटा राजनचे नाव पेशंट असे ठेवले.
दाऊद चा खास शूटर असणाऱ्या जुनेद ला ऑगस्ट महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर या कोडवर्ड चा पर्दाफाश झाला.
3.एम्स हॉस्पिटल-

‘पेशंट एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट है’ आपल्यासाठी हा संवाद खूप कॉमन आहे पण डि-गॅंग च्या भाषेत या शब्दांचा अर्थ म्हणजे ‘छोटा राजन तिहार जेलमध्ये आहे’.
हे अशे फसवे कोडवर्ड वापरून अंडरवर्ल्ड नेहमीच सुरक्षा यंत्रणांना हुलकावणी देत आले आहे. एम्स हॉस्पिटल हा कोडवर्ड तिहार जेलसाठी वापरला जातो. सर्वसामान्य व्यक्ती विचारही करू शकत नाही की एखाद्या हॉस्पिटलचे नाव हे जेलसाठी वापरले जाऊ शकते.
4.डॉक्टर-
डॉक्टर म्हणजे सर्वांना मदतीसाठी धावून येणारा देवदूतच. पण अंडरवर्ल्ड मध्ये एखाद्या खबरी किंवा गुप्तहेराला डॉक्टर नावाने ओळखले जाते.
5.इंग्लिश वाली-
या शब्दांचे अनेक अर्थ निघतात. मद्यपानाशी निगडित वाटणाऱ्या या शब्दाला अंडरवर्ल्ड मध्ये खूप महत्व आहे. कारणही तसेच आहे इंग्लिश वाली हा कोडवर्ड वापरलो जातो ‘ऑटोमॅटिक पिस्टल’ साठी.
‘साहब आज इंग्लिश वाली लाया हु’ हे वाक्य ऐकून कोणी विचारही करणार नाही की हे हत्यारांच्या तस्करीसाठी वापरले जात आहे.
6.हिंदी वाली-
इंग्लिश वाली प्रमाणे हिंदी वाली हा कोडवर्ड देशी हत्यारांसाठी (कट्टा) वापरला जातो. दाऊद कंपनी नेहमीच भारतीय सुरक्षा यंत्रणांना डोळ्यासमोर ठेवून या कोडवर्ड ची लिस्ट बनवत असे.
7.महाराज-

महाराज हा शब्द ऐकताच आपल्याला देवधर्माशी निगडित व्यक्ती आठवतात, पण माफिया हा कोडवर्ड एका नावाजलेल्या पोलीस ऑफिसर साठी वापरत असत. ते पोलीस अधिकारी होते एन्काऊंटर स्पेसिएलिस्ट विजय साळसकर.
8.बावा-
विजय साळसकर प्रमाणे प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा यांच्यासाठी माफिया बावा हा कोडवर्ड वापरत असत. प्रदीप शर्मा हे परत ड्युटीवर आले आहे त्यामुळे त्यांची हि इनिंग पाहण्यालायक राहीलच.
9.अण्णा-
आपल्या गावात शाळा करण्यासाठी 1 करोड रुपये जमा करण्यावरून विवादात सापडलेले दया नायक हे करोडपती म्हणून ओळखले जातात. ते दक्षिण भारतीय असल्यामुळे काही गॅंग त्यांच्यासाठी अण्णा हा कोडवर्ड वापरत असत.
10.बिडी-
पूर्वीच्या काळात पोलिसांना पांडू आणि ठुल्ला या नावाने माफिया जगतात ओळखले जायचे.पण आता पोलिसांसाठी बिडी हा कोडवर्ड अंडरवर्ल्ड मध्ये वापरला जातो.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सामान्य माणसांना नाटक व चित्रपटामध्ये वापरले जाणारे कोडवर्ड माहिती असतात. त्यामुळे हे नवीन शब्द अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जात आहेत व हे कोडवर्ड प्रत्येक 3-4 वर्षाला बदलले जातात.
11.गिटार-
संगीत क्षेत्राशी निगडित वाटणाऱ्या या शब्दाला माफिया जगतात एका हत्यारासाठी कोडवर्ड म्हणून वापरले जाते. एक-47 बंदुकीसाठी गिटार हा नवीन कोडवर्ड माफिया जगतात तयार झाला आहे.
एके-47 साठी पूर्वी झाडू हा कोडवर्ड माफिया लोक वापरत असत.
12.लॉटरी-
अंडरवर्ल्ड मध्ये फोनवर बोलताना कधीच कॅश,करन्सी व पैसे हे शब्द वापरले जात नाहीत. पैशासाठी आगोदर कागद हा कोडवर्ड वापरला जायचा पण आता कागदाची जागा घेतलीये लॉटरी या कोडवर्ड ने.
ड्रग तस्करीसाठी कोडवर्ड म्हणून अंडरवर्ल्ड माफिया वापरतात बॉलीवूड सेलिब्रिटी चे नावे,
1.रणवीर सिंग
रणवीर सिंग च्या नावामागे एक खास सिक्रेट कोडवर्ड दडलेला आहे. अंडरवर्ल्ड माफिया ड्रग विक्रेत्याला रणवीर सिंग म्हणून ओळखतात.
2.आलिया भट्ट
कोकेन सारख्या खतरनाक ड्रग ची तस्करी करण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतात कोकेन या शब्दाऐवजी आलिया भट्ट चे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरला जातो.
3.रणवीर कपूर
ड्रग तस्करी करताना जो होस्ट असतो त्याच्यासाठी रणवीर कपूर चे नाव वापरले जाते.
4.कंगना राणावत
अफीम या ड्रग ची तस्करी करण्यासाठी कंगना राणावतचे नाव वापरले जाते. सेलेब्रिटी चे नाव वापरल्यामुळे डील मध्ये गडबड होण्याचा धोका कमी असतो व सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यास ही मदत होते.
5.कतरीना कैफ
Smack साठी माफिया जगतात बॉलीवूड ची सुपरस्टार कतरीना जैफ चे नाव सिक्रेट कोडवर्ड म्हणून वापरले जाते.
तर हि आहेत काही अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे गुप्तशब्द माहिती आवडल्यास शेअर करा…
वाचा पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कथा…
Comments 1