मराठा लाईट इन्फण्टरी २
मागील भागा मध्ये आपण लाईट इन्फण्टरी म्हणजे काय हे आणि मराठे त्या साठी कसे योग्य होते हे ही आपण पाहिलं. आता या भागात मराठा लाईट इन्फण्टरीची स्थापना आणि इतिहास पाहू .

३० डिसेंबर १६०० रोजी काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्या तर्फे या कंपनीला भारतातील व्यापाराचे सारे अधिकार देण्यात आले. त्या नंतर १६०८ साली कंपनीचे पहिले जहाज सुरतेच्या बंदरात येऊन धडकलं. त्या काळी भारतात सगळ्यात मोठी राजवट होती मुघलांची.

१६१५ साली इंग्रज वकील सर थॉमस रोय याने जहांगीरच्या दरबाराला भेट दिली आणि इंग्रज राजा जेम्स प्रथम याच्या वतीनं सुरतेत वखार बांधण्या साठी परवानगी मिळवली. हळू हळू या कंपनीने आपली दुकाने महत्वाच्या बंदरात उघडली जसे कि मद्रास, मुंबई, कलकत्ता. १७१७ साली या कंपनीने कमाल केली आणि मुघलांकडून एक फर्मान मिळवला. त्या फर्मान नुसार कंपनीला कस्टम ड्युटी मध्ये भरपूर सवलत दिली गेली. ज्यामुळे या कंपनीच्या नफ्यात भरपूर वाढझाली आणि कंपनीची पाळेमुळे भारतीय उपखंडात खोलवर रुजली.

इंग्रज महा धूर्त जात आता धंदा वाढला उत्पन्न वाढलं मग रखवालदाराची गरज भासली. मग ज्या त्या ठिकाणी ज्या त्या वाखरीने आपापले रखवालदार भरती केले. आणि यातूनच जन्म झाला मराठा लाईट इन्फन्ट्रीचा. याच इंग्रजाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या अंगीचे युद्ध कौशल्य चपळता काटकपणा चिवटपणा अनुभवला पहिला आणि मराठ्यांची पहिली बाटलीन मुंबई मधे उभी केली तिचा नाव होता जंगी पलटण ती फक्त मुंबई पूर्ती मर्यादित होती.

सन १७४८ साली मेजर स्ट्रींजर लॅरेन्स याने सर्व वखारीतील छोटे छोटे सैन्य एका छत्रा खाली आणले. आणि अशा प्रकारे कंपनीचे एक सैन्य उभे राहिले. हाच मेजर स्ट्रींजर लॅरेन्स फादर ऑफ इंडियन आर्मी म्हणून हि ओळखला जातो (फर्स्ट कमांडर इन चीफ ऑफ इंडिया). या मेजर स्ट्रींजर लॅरेन्सने कवायती फौजेची उभारणी केली प्रत्येक भागात वेगवेगळ्या रेजिमेंट आणि बटालियनची स्थापना केली.

याच उपक्रमा अंतर्गत मुंबईच्या जंगी पलटण मध्ये आजून भरती करून ऑगस्ट १७६८ मराठा रेजिमेंटच्या दुसऱ्या बटालियन ची स्थापना झाली तिचा नाव होता बॉम्बे शिपोय. पुढील वर्षी अजून एक बटालियन ची भरती केली गेली तिचा नाव होता काली पाचवीन. पुढे या सगळ्या बटालियन मराठा लाईट इन्फण्टरी नवा खाली एकत्र केल्या गेल्या.

त्या मूळच मराठा लाईट इन्फण्टरीची स्थापना ऑगस्ट १७६८ हीच ग्राह्य धरली जाते. १८ व्या शतकात सुरतेपासून कण्णूर (केरळ) पर्यंतच्या सौरक्षणाची जबादारी या सैन्यावर होती. १९ व्या शतकात या सैन्याने देशात नव्हेतर जगात अतुलनीय शौर्य गाजवलं. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर आज पर्यंत अविरत देश सेवा चालू आहे .
मराठा लाईट इन्फण्टरी विषयी सर्वसाधारण माहिती
नाव- मराठा लाईट इन्फण्टरी स्थापना- १७६८ साजरा केला जाणारा स्थापना दिवस- ४ फेब्रुवारी सैनिकांचे संबोधन (टोपण नाव )- गणपत
वॉर क्राय- बोल छत्रपती शिवाजी महाराजकी जय ! हर हर महादेव ! हेड क्वार्टर- पुणे (Southern Command) प्रिन्सिपॉल / मोटो- कर्म, सन्मान,धैर्य
चिन्ह- सगळ्यात वरती तीन सिहांचा राष्ट्र चिन्ह स्वातंत्र्या पूर्वी ब्रिटिश मुकुट , त्याच्या खाली बिगुल, बिगुल आणि स्वातंत्र्या नंतर राष्ट्रचिन्हाच्या मध्ये दोन तलवारी आणि एक ढाल
मिळालेली पदके- २ व्हिक्टोरिया क्रॉस ४ अशोक चक्र १० परम विशिष्ट सेवा मेडल ४ महावीर चक्र ४ कीर्ती चक्र १४ अति विशिष्ट सेवा मेडल ३४ वीर चक्र १८ शौर्य चक्र ४ युद्ध सेवा मेडल १०७ सेना मेडल २३ विशिष्ट सेवा मेडल १ पद्म भूषण १ अर्जुन अवॉर्ड
मराठा लाईट इन्फण्टरी च्या शौर्य कथा पुढील भागात पाहू
मराठा लाईट इन्फण्टरी भाग १ वाचण्याकरिता क्लिक करा…
पोस्ट साभार अभिजित वाघ