लिओनार्ड विलोबी यांनी म्हटले आहे, “जसे आपण आपल्या स्वत: च्या मनाप्रमाणे जगू लागता आणि तेव्हा तुमच्यासाठी सर्वकाही शक्य होते”. रमेश बाबू ज्याने आपल्या चकचकीत नशिबाला आकार दिला आणि तो कोट्याधीश झाला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तीव्र अडथळ्यांवर मात करून यशाची उंची गाठतात, जे सुरुवातीपासून आपल्या सभोवती आहेत ते कधीही कालबाह्य होत नाहीत. ते आम्हाला प्रेरणा देतात आणि आपली इच्छा जागृत करतात, आम्हाला विश्वास आहे की आपणही त्यांचे अनुकरण करू शकता. रमेश बाबूंनी १९९४ मध्ये आपल्या कटकसरीतून मारुती व्हॅनची खरेदी केली. २००४ मध्ये त्यांनी ७ कारसह आपला कार भाड्याचा व्यवसाय चालू केला.२०१४ मध्ये त्यांच्याकडे तब्बल २००कार जमा झाल्या. आजतागायत त्यांच्याजवळ वेगवान ७५ लक्झरी कार आहेत त्यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्लू, ऑडी, पाच आणि दहा सीटर लक्ज़री व्हॅन आणि त्यांची ड्रीम कार रोल्स रॉयस कार आहे.
रमेश बाबू
रमेश बाबू यांचे सुरुवातीचे जीवन अत्यंत संघर्षमय होते. आता, यशाच्या उंच शिखरावर असताना देखील ते त्याच निष्ठेने आपले केशकर्तनालय चालवितात. हायस्कूल ला लॉक मारणे हा त्यांचा वडिलांचा वारसा त्यांनी आजपण जपून ठेवला आहे. अगदी आता ते मोठ्या आत्मविश्वासाने सेवा म्हणून ते काम करतात. ह्या सेवे द्वारे त्यांना केवळ शंभर रुपय मिळतात. देशभरातील दूरचित्रवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये ते प्रदर्शित झाले आहेत. त्याच्या अभूतपूर्व यशाने त्याच्या निरुत्साही नम्रतेमुळे त्याला “मिलेनियर बार्बर”असे नाव दिले.त्यामुळेच ते सर्वत्र ह्याच नावाने प्रचलित आहेत.ग्रामीण भागात त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.बघूया त्यांच्या सर्वसामान्य बार्बर ते कोट्याधीश बार्बर ची प्रेरक कहाणी.
खरतड सुरुवात
त्यांचा जन्म एक गरीब कुटुंबात झाला.त्यांचे वडील न्हावी होते.ते अवघ्या ७ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.त्यांची आई लोकांकडे चाकरी करत होती. सलून चा व्यवसाय वडील गेल्यानंतर त्यांच्या काकांनी घेतला ते त्याचा मोबदला म्हणून दररोज पाच रुपये देत.त्याकाळात माझी बहिण,भाऊ व आमच्या शिक्षण घेण्यासाठी तसेच काही अडचणी भागविण्यासाठी अत्यंत कमी होते.त्यामुळे घरी एक वेळेसच अन्न शिजविण्याचे ठरविले. माध्यमिक शिक्षण घेत असताना मी शाळेबरोबर व्यवसाय सूरु केला जेणेकरून आई ला हातभार लागेल.त्यांनी वृत्तपत्रे व दुध पाकिटे विकली.असे करत त्यांनि कसेबसे आपले इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
ब्रेकिंग पॉईंट
९० च्या दशकाच्या सुरुवातीस मी माझे कॉलेज शिक्षण घेत असताना माझ्या आईचे व काकांचे जोरदार भांडण झाले.व त्यांनी आम्हाला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.त्यामुळे मी स्वतः सलून चालविण्याचा निर्णय घेतला परंतु आई सहमत नव्हती कारण माझे शिक्षण सुरू होते.अखेर मी सलून स्वतः चालविण्यास सुरुवात केली.
सकाळी सलून व सायंकाळी कॉलेज व पुन्हा सलून असा दैनिक क्रम चालू झाला.आणि माझी ओळख सर्वत्र न्हावी म्हणून झाली.
यशस्वी कल्पना
१९९३ मध्ये मी एक जुनी मारुती व्हॅन घेतली.काकांकडे असलेली कार बघून मला पण कार घेण्याची इच्छा झाली.त्यासाठी मी बचत करण्यास सुरुवात केली व थोडेसे कर्ज घेऊन काकापेक्षा महागडे वाहन खरेदी करून दाखविले.ते कर्ज चुकविण्यासाठी आजोबांनी संपत्ती गहाण ठेवली.त्या कर्जावरील व्याज निव्वळ ६८०० रुपये जी चुकविण्यासाठी माझी चांगलीच दमछाक झाली.
माझी आई ज्यांच्याकडे काम करायची त्यांना मी नंदिनी आक्का नावाने बोलावायचो.एक दिवस त्यांनी मला विचारले की तू तुझ्या कडील कार भाड्यावर का नाही चालवत? त्यानी मला त्या बद्दत मार्गदर्शन केले व एक हितचिंतक नात्याने चांगला सल्ला दिला.आज त्या माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनले आहेत.त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात सर्वांची ओळख करून दिली.
यशस्वी उद्योगाची उभारणी
१९९४ पासून मी कार भाड्याच्या व्यवसायात जबाबदारीने लक्ष घातले आणि Intel कंपनीला गाड्या भाड्याने देने चालू केले कारण त्या कंपनीत नंदिनी आक्का कार्यरत होत्या व त्याच माझ्या गाड्या कंपनीसाठी ठरवीत.ह्या व्यवसायात मी अजून गाड्या घेण्याचे ठरविले.२००४ पर्यंत माझ्याकडे केवळ५ ते ६ कार होत्या. त्यामुळेच मी सलून बंद करण्याचा निर्णय घेतला कारण त्यामध्ये त्याकाळात काही आवक नव्हती.माझ्या ह्या गाड्यांच्या व्यवसायात स्पर्धा देणारा कोणीच नव्हता त्यामुळे व्यवसाय चालूच होता पण त्याकाळात जवळपास सर्वांकडे कार होत्या म्हणून मी लक्झरी कार घेण्याचा निर्णय घेतला जो यापूर्वी कोणीही घेतला नव्हता
अखेरीस धोका पत्करला
२००४ मध्ये जेव्हा मी माझी पहिली लक्झरी कार घ्यायचे ठरवले तेव्हा सर्वजण मला मूर्खाय काढू लागले.तू घोडचूक करत आहे असे बोलूनसुद्धा दाखविले. २००४ मध्ये लक्झरी कार मध्ये चाळीस लाख गुणविणे हे माझ्यासाठी अत्यंत जिकरीचे काम वाटत होते.त्यामुळे मी अत्यंत भयभीत झालो होतो.पण मी धोका पत्करला व कार घेतली .मी माझ्या मनाला सांगत होतो की जर आपल्याला तोटा झाला तर कार विकून टाकायची.
मी बंगलोर मधील लक्झरी कार घेणारा पहिला व्यक्ती ठरलो कारण त्याकाळी सर्व भाड्याने देणाऱ्याकडे जुनी विकत घेतलेली कार होत्या व त्या कार ची स्थिती सुद्धा माझ्याजवळ असणाऱ्या कार पेक्षा उत्तम नव्हती.
जर आपणांस व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी कुठलाही धोका पत्करावा. जेव्हा मी २०११ मध्ये रोल्स रॉयस घेण्याचे ठरविले तेव्हा अनेकांनी मला बजावले की एवढ्या महागड्या गड्याना काही पुढे व्याप्ती नाही.तेव्हा मी माझ्यामनात बोलत की आपण यापुर्वी एक धोका पत्करला मग एक पुन्हा एका दशकानंतर का नाही?
मला ही गाडी घेण्यास अंदाजे ४ करोड रुपये मोजावे लागले. आणि हे सुद्धा आव्हान मी पेलले.डिसेंम्बर महिन्याच्या अखेरीस कारवरील संपूर्ण कर्ज मी फेडणार आहे.
आव्हाने
प्रत्येक धंद्यात आव्हाने उतार चढाव असतातच त्याला आपण सामोरे गेले पाहिजे.मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये मी माझेवर असलेले ३ करोड रुपये कसे फेडले हे माझे मलाही कळले नाही.अनेकांना पैसे मागितले जमिनीचे कागदपत्रे गहाण ठेवून मी माझे कर्ज फेडले. प्रत्येकाने आव्हान स्वीकारून त्याला पेलण्याची ताकद ठेवली पाहिजे.
उद्योजकांना प्रेरक संदेश
रमेश बाबूंनी उद्योजकांना साध्या संदेशाचा पुनरुच्चार केला की त्यांनी आपल्या टेड्स वार्तालापाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सांगितले.
रमेश बाबू यांच्या या यशास खासरेचा सलाम…
Role Model for today youth . Very inspiring story!!!!