भारतीय वायूसेनेचे मार्शल अर्जन सिंघ यांचे काल सायंकाळी ७:४७ला निधन झाले. वयाच्या ९८व्या वर्षी सेवा देणारे अधिकारी अर्जन सिंघ होते. भारतिय सैन्यात एकमेव ५ स्टार रँक असणारे एकमेव सैन्य अधिकारी अर्जन सिंघ हे आहेत. त्यांच्यावर भारतीय सेनेच्या दिल्ली येथील R&R Hospital मध्ये इलाज सुरु होता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदि व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्जन सिंघ यांना दवाखान्यात भेट दिली. परंतु मृत्यू हा अटळ आहे. तो या वीर योद्ध्यालापण चुकला नाही. युद्धभूमीवर अनेकांना पाणी पाजणारे अर्जन सिंह मृत्यूसमोर हरले. तर बघूया आज खासरे वर अर्जन सिंह भारतीय सैन्याचा हिरो यांच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी…

अर्जन सिंघ यांचा जन्म एप्रिल १५ , १९१९ ला ल्यालपूर पंजाब (सध्या हा भाग पाकिस्तान मध्ये आहे) येथे झाला. सैनिकीपेशा असणार्या परिवारात त्यांचा जन्म झाला.
त्यांचे वडील,आजोबा व पंजोबा सर्वांनी सैन्यात काम केले आहे. अर्जन सिंघ यांची चौथी पिढी जी सैन्यात दाखल झाली होती.
अर्जन सिंघ यांनी १९ व्या वर्षी रॉयल एअरफोर्स कॉलेज , कार्न्वेल (इंग्लंड) येथे प्रवेश मिळविला. आणि २० व्या वर्षी १९३९ मध्ये ते पदवीधर वैमानिक झाले.
१९४४ साली त्यांना स्क़ार्डन लीडर बनविण्यात आले. जपान विरुध्द बर्मा मध्ये केलेल्या अद्वितीय कामगिरी करिता Distinguished Flying Cross देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

१ ऑगस्ट १९६४ साली एअर मार्शल अर्जन सिंघ यांना एअर स्टाफचे प्रमुख पद (Chied Of The Air Staff) देण्यात आले. ते पहिले सिख अधिकारी होते ज्यांना हा किताब मिळाला होता.
१९६६ साली त्यांना एअर चीफ मार्शल (ACM) पदवी देण्यात आली. ते पहिले असे अधिकारी आहे ज्यांना CAS वरून ACM ची पदोन्नती देण्यात आली.
१९६५ साली झालेल्या भारत पाक युद्धात अर्जन सिंघ यांनी प्रमुख भूमिका निभावली. त्यांच्या मुळे संपूर्ण युद्धाचे चित्रच बदलले. पाकिस्तान ने ऑपरेशन Grand Slam सुरु केले होते. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणाना त्यांनी हमी दिली कि भारीय वायू सेना पाकिस्तानचे हे ऑपरेशन एका तासात बंद पाडू शकते. आणि त्यांनी ते करून सुध्दा दाखविले.
युद्धातील त्यांच्या कामगिरीकरिता त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अर्जन सिंघ हे सर्वाधिक काळ भारतीय सैन्यास सेवा देत राहिले. वयाच्या ५० वर्षा पर्यंत Chief of Air Staff म्हणून त्यांनी काम पाहिले.
१९७१ पर्यंत ते भारताचे राजदूत म्हणून स्विझर्लंड येथे काम पहिले त्यानंतर १९७४ पर्यंत केनिया मध्ये आणि नंतर उप राज्यपाल दिल्ली १९८९ पर्यंत त्यांनी पदभार स्वीकारला.
२००२ साली तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी त्यांना मार्शल ऑफ इंडियन एअर फोर्स हि पदवी देऊन सन्मानित केले..
त्यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्य भारतीय वायू सेनेनी पनागड एअर बेसला पश्चिम बंगाल एअर मार्शल अर्जन सिंघ एअर बेस हे नाव देण्यात आले.
भारतातील सर्वात वयोवृद्ध या सैन्य अधिकाऱ्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची ६० विमाने चालवली आहे. १९६९ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. ते असे भारतातील एकमेव सैन्य अधिकारी आहे ज्यांना हि संधी मिळाली.
त्यांच्या कार्यकाळात भारतीय हवाई दलास supersonic fighters, strategic reconnaissance aircraft, tactical transport aircraft आणि assault helicopters मिळाले होते.
भारताच्या या खऱ्या हिरोस खासरे तर्फे सलाम…