सुंदर पिचाई जे पूर्वी गुगलचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (अँड्रॉईड , क्रोम आणि अॅप्स डिविजन) होते. सध्या गुगलचे बॉस म्हणजे CEO आहेत. सुंदर पिचाई हे टेक वर्ल्डमधील एक मोठे नाव आहे. अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. सुंदर पिचाई मागील १२ वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. आज खासरेवर तुम्हाला सांगणार आहे सुंदर पिचाईबद्दलची इतर कोणाला जास्त माहित नसलेली माहिती
गूगलकडून मिळाले होते 50 मिलियन डॉलर (३०५ कोटी)
mensxp.com ने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने 2011 मध्ये पिचाई यांना नोकरीची ऑफर दिली होती, मात्र गुगलने त्यांना 50 मिलियन डॉलर (जवळपास 3053250000 रुपये म्हणजेच 305 कोटी रुपये) देऊन थांबवून घेतले. सध्या ते $650 million डॉलर भारतीय रुपये 41,69,42,50,000 चे मालक आहेत.
सुंदर पिचाई एक असे व्यक्तीमत्व आहे, ज्यांनी फार कमी वेळात खुप मोठे नाव कमावले आहे. मागील वर्षी त्यांचे प्रमोशन झाले आणि त्यांना गुगलचे CEO बनवण्यात आले. यामुळे त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची मानली जाते. अँड्रॉईड, क्रोम आणि अॅप डिव्हीजनचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट असताना पिचाई यांनी गुगलचे अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट इनोव्हेट केले आहेत. सध्या गुगलचे सर्वात महत्वाचे व्यक्ती सुंदर पिचाई आहे.
४४ वर्षे वय असलेल्या सुंदर पिचाई यांचा जन्म १९७२ मध्ये झाला. त्यांचे खरे नाव पिचाई सुंदराजन असे आहे. त्याची पत्नीचे नाव अंजली आहे. दोघाची प्रेम कथाहि सिनेमा बनविण्या सारखी अआहे. सुंदराजनला आता संपूर्ण जग सुंदर पिचाई याच नावाने ओळखते. पिचाई यांनी 2004 ला गुगलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते प्रोडक्ट आणि इनोव्हेशन डिव्हीजनचे ऑफिसर होते. त्यांचा हा १३ वर्षाचा प्रवास त्यांनी स्वतःच्या बुध्दिमत्तेवर कमविला आहे.
दोन खोल्यांचे होते घर
चेन्नईच्या दोन खोल्यांच्या घरात राहाणारे सुंदर पिचाईच्या घरी टीव्ही नव्हता, आणि टेलिफोनही नव्हता. अभ्यासात हुशार असलेल्या सुंदरला पुढील शिक्षणासाठी आयआयटी खडगपूर येथे प्रवेश मिळाला. येथूनच त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठीची शिष्यवृत्ती मिळाली आणि अमेरिका हे त्यांचे दुसरे घर बनले. मात्र सुंदर यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा यावरूनच अंदाज लावता येईल की, सुंदर यांच्या विमानप्रवासासाठी त्यांच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले होते. या सर्व गोष्टीची जाणीव असल्यामुळे सुंदर पिचाई यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
पेन्सिलवानिया यूनिवर्सिटीत सायबर स्कॉलर या नावाने पिचाई यांना ओळखले जाते . पिचाई यांनी त्यांची बॅचलर डिग्री आयआयटी, खड़गपूरवरून मिळवी आहे. तुम्हाला वाटेल कि पिचाई हा कॉलेज मधील सर्वात हुशार विद्यार्थी असेल तर तसे नाही त्यांच्या बॅचमधील ते सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी आहेत. यूएसमध्ये सुंदरने ‘एमएस’ चे शिक्षण स्टॅनडफोर्ड यूनिवर्सिटीमधून पूर्ण केले आणि वॉर्टन यूनिवर्सिटीतून त्यांनी ‘एमबीए’ केले.
अमेरिकेत संघर्षाचा काळ
1995 मध्ये स्टॅनफोर्डला गेलेले सुंदर हालाखीच्या परिस्थितीत पेईंग गेस्ट म्हणून राहिले. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी जुन्या वस्तूंचा वापर करायला सुरूवात केली. मात्र शिक्षणासोबत जराही तडजोड केली नाही. त्यांना पीएचडी करायची होती, मात्र परिस्थितीमुळे त्यांनी प्रोडक्ट मॅनेजर अप्लायड मटीरियल्स (Applied Materials) इंक मध्ये नोकरी स्वीकारली. यामध्ये ते प्रसिद्ध कंपनी मॅक्किंसे (McKinsey) येथे कंसल्टंट म्हणून काम पाहायचे. तेव्हा त्यांना कोणीच ओळखत नव्हते.
गूगलने बदलविले आयुष्य
वेळ बदलला आणि 1 एप्रिल 2004 ला पिचाई गुगलमध्ये आले. सुंदर यांचा पहिला प्रोजेक्ट प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि इनोव्हेशन डिव्हीजनमध्ये गुगलच्या सर्च टुलबारला अधिक उत्तम बनवून दुसर्या ब्राऊझरचे ट्रॅफीक गुगलवर आणणे हे होते. या दरम्यान त्यांनी गुगलने स्वतःचेच ब्राऊझर लॉन्च करावे अशी कल्पना सुचवली. या एका कल्पनेने पिचाई गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या नजरेत आले. मग काय, येथून त्यांची ओळख होणे सुरू झाले. 2008 ते 2013 पर्यंत सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वात क्रोम ऑपरेटींग सिस्टीमचे यशस्वी लॉन्चिंग झाले आणि त्यानंतर अँड्रॉईड मार्केट प्लेसने त्यांना जगभरात ओळख दिली.
स्वतःची क्षमता केली सिद्ध
सुंदर याला कंपनीत एवढे महत्वाचे स्थान का त्याचे उत्तर आहे त्यांनी बनविलेले प्रोडक्ट त्यांनीच गूगल ड्राइव, जीमेल अॅप आणि गुगल व्हिडीओ कोडॅक यांची निर्मिती केली आहे. त्यांनी बनवलेले क्रोम ओएस आणि अँड्रॉईड अॅपने त्यांना गुगलच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचवले आहे. एकंदर आज गुगल सुन्दरमुळेच एक नंबरवर आहे.
मागील काही वर्षापूर्वी पिचाई यांना अंड्रॉईड डिव्हीजन देण्यात आले आणि त्यांनी गुगलच्या इतर व्यवसायांना पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. सॅमसंग हा गुगलचा सर्वात मोठा पार्टनर सुंदर मुळेच आहे.
प्रोटक्ट मॅनेजरच्या रुपात
प्रोडक्ट मॅनेजरच्या रुपात जेव्हा त्यांनी गुगलमध्ये कामास सुरूवात केली, तेव्हा इंटरनेट युजर्ससाठी संशोधन केले, त्यांना लक्षात आले कि इंस्टालेशन हि अतिशय किचकट प्रक्रिया आहे. युजर्सला इन्स्टॉल करायचे असेल तर ते लवकरात लवकर इन्स्टॉल होईल. त्यानंतर त्यांनी स्वतःला सिध्द करण्यासाठी इतर कंपन्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. आणि हि प्रक्रिया संशोधन करून सोपी केली ज्यामुळे टुलबार अधिक चांगला बनले.
यानंतर त्यांना प्रोडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर बनवण्यात आले. 2011 मध्ये जेव्हा लॅरी पेज गुगलचे सीईओ बनले, तेव्हा त्यांनी सुंदर यांना प्रमोट करत सीनियर व्हाईस प्रेसिडेंट बनवले.
आज पिचाई हे लॅरी पेजसाठी एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहे, आणि ते त्यांच्यासमवेत नेहमी मिटिंग्ससाठी जातात. पिचाई यांनी पेज यांच्यासोबत व्हॉट्सअपचे सीईओ जॅन कॉम यांची भेट घेतली आणि त्यांना व्हॉट्सअप फेसबुकला न विकण्यास राजी केले होते. याप्रकारे त्यांनी Nest’sच्या टोनी फॅडेल (Tony Fadell) ला गुगल जॉईन करण्यासाठी मनवले.
जर तुम्हाला हि खासरे माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका…
वाचा अनेक प्रशासकीय अधिकारी बनविणारा शिक्षक गुरु रेहमान विनामुल्य देतो शिक्षण