सिंधूताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून अनाथांच्या,उपेक्षितांच्या तसेच वंचितांचा जगण्याची नवी उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत आहे.आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.
७० वर्षीय महिला आपल्या भूतकाळातील वेदनादायक प्रसंग मागे टाकून प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचे निराकरण करत आहे.त्यामुळेच त्यांना ‘अनाथांच्या आई’ नावाने संबोधले जाते.त्यांच्या वयक्तिक जीवनात डोकावुन बघितल्यास त्यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या आयुष्यात किती संकटे आलीत व किती त्याचा त्रास झाला याचा आपण अंदाज लावू शकतो.अनेक वाईट अनुभवांचा तोंड देत आलेल्या माईंच्या चेहऱ्यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरित होऊ शकतो यात काहीच दुमत नाही..!!
“ज्यांना कोणीच नाही त्या सर्वांसाठी मी आहे” असे त्या अत्यंत प्रेमाने बोलून दाखवितात.आपण एक सामान्य स्त्री ते असामान्य माई असा त्यांचा जीवनप्रवास बघू शकतो.एक नको असलेले बालक म्हणून त्यांना काय काय सोसावे लागले हे आपण त्यांना घरातून दिलेल्या ‘चिंधी’या टोपणनावावरून अंदाज लावता येईल.
सिंधुताईंचे वडील त्यांना नेहमीच धीर देत असत तसेच शिक्षण देण्यावर सुद्धा त्यांचा भर होता. परंतु कौटुंबिक जबाबदारी व लवकरच झालेला बालविवाह यामुळे त्यांना इयत्ता ४ थी नंतर शिक्षण सोडावे लागले.
ताईंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे १४ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पाटी घेऊ शकत नसल्याने त्या लिखाण करण्यासाठी भराडी ची पाने वापरून आपले कसेवसे शिक्षण पूर्ण करीत होत्या परंतु बालवयात झालेल्या विवाहामुळे त्यांची अभ्यासातील रुची कमी झाली.
“मला लग्नाच्या पूर्व संध्येला सांगितले गेले होते की स्त्रीच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी असतात एक जेव्हा ती विवाह बंधनात अडकते आणि दुसरं म्हणजे ती स्वर्गवासी होते.” वर्धेच्या नवरगाव जंगलात माझ्या नवऱ्याच्या घरचे मिरवणुक घेऊन आले तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा.
तिने वयाची तिशी गाठलेल्या माणसाबरोबर लग्न केले. माई चे पती त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. तसेच तिला मारहाण करत होते. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला.
यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. वयाच्या विसाव्या वर्षी नऊ महिन्यांची गर्भवती असताना त्याने माईंना घराबाहेर फेकून दिले. तिने त्याच दिवशी आपल्या घराबाहेर असलेल्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला आणि त्याच बिकट परिस्थितीत काही मैल अंतरावरील तिच्या आईच्या घराकडे धाव घेतली जिने तिला आश्रय देण्यास नकार दिला होता.
माई उद्गारली “मी नाळ कापला आहे.” या घटनेने माईच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. ज्यामुळे तिने स्वतः आत्महत्या करण्याचा विचारसुध्दा केला, परंतु त्या कुजलेल्या विचारांवर मात करत आपल्या मुलीच्या संगोपनासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म वर भीक मागणे चालु केले.
अनेक दिवस घालवल्यावर त्यांना असे जाणवले की आपल्याप्रमाणे असे असंख्य अनाथ बालके आहेत. एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली.
त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. ज्यांना त्यांच्याप्रमाणेच सतत त्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे .माई त्यांच्या वेदना समजू शकत होत्या त्यामुळेच त्यांनी त्या अनाथांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
तिने दत्तक घेतलेल्या अनेक मुलांचे पालन-पोषण करण्यास सुरुवात केली. हळूहळू तिने अनाथ मुलांना जवळ प्रयत्न केला आणि काही कालांतराने ती “अनाथांची आई” म्हणून उदयास आली.
आजपर्यंत त्यांनी २५०० पेक्षाही जास्त अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे आणि त्यांना पोषक आहार दिला आहे, त्यांना शिक्षण देण्यास मदत केली आहे काहींचे लग्नसुद्धा केले आहे आणि त्यांना जीवन जगण्यास मदत केली आहे. तिला प्रेमाने “माई” (आई) असे संबोधले जाते. माई त्यांना आपल्या पल्याप्रमाणेच वागणूक देते. त्यापैकी काही आता वकील, डॉक्टर आणि अभियंते व अनेक मोठ्या पदावरील अधिकारी झाले आहेत.
माई सांगतात जेव्हा त्या एक मुलगी व स्वतः च्या अस्तित्वासाठी दररोज एकट्या झुंज देत होत्या तेव्हा त्यांना लक्षात आले की आपल्या प्रमाणेच असे अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना ह्या जगात कोणीही नाही आणि त्याच क्षणी त्यांनी त्या मुलांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.
मुलां-मुलींमधील भेद दूर करण्यासाठी निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले. जी आज स्वत: आज एक अनाथाश्रम चालवत आहे.सिंधुताईंना अनाथांना त्यांच्या कार्यासाठी ५०० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
सिंधुताईने आपल्या प्रेम आणि दयाळू स्वभावामुळे २०७ पेक्षाजास्त जावई, ३६ मुली आणि हजारहून अधिक नातवंडांचा एक मोठा परिवार जमविला आहे. आजपर्यंत सुद्धा तीला आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत आहे. ती कोणाचाही आधार घेत नाही फक्त आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी ठिक ठिकाणी भाषणे देते.
“देवाच्या कृपेने माझ्याजवळ उत्तम संभाषण कौशल्य आहे” ज्याद्वारे मी कोणावरही आपला प्रभाव पाडू शकते. भूकेने मला बोलायला शिकविले आणि आज तेच माझे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.भाषणाद्वारे मिळणाऱ्या पैशावर मी अनाथ मुलांचे पालन पोषण करते असे माई मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात.
अनेक वर्षे पतीच्या गैरवर्तणुकीमुळे त्रासलेल्या माई जवळ खुद्द पतीने येऊन त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली.आणि माईंनी त्यांना मनाचा मोठेपणा दाखवत एखाद्या लहान मुलाला माफ केल्याप्रमाणे माफ केले.आज ते दोघेही अत्यंत आपुलकीने अनेक अनाथांचे संगोपन करत आहे.
२०१६ मध्ये सिंधुताईच्या कार्यासाठी, समाजसेवेकरिता त्यांना D.Y.Patil Institute of Technology मार्फत डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांच्या पुरस्काराची यादी लिहायला गेल्यास आजचा लेख कमी पडेल हे नक्कीच आहे.
सिंधुताईच्या या खडतर आयुष्यावर मागे सिनेमाही येऊन गेला. तेजस्विनी पंडीत यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका निभावलेली आहे. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाला होता. अनंत महादेवन नि हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे.
सिंधुताईंच्या ह्याच धैर्यवान आणि त्याकामात झोकून दिलेल्या व्यक्तीतत्वामुळे त्यांना ५०० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना ह्या पुरस्कारातून जे काही रक्कम मिळते ती रक्कम त्या निस्वार्थी भावाने अनाथांना घर बांधून देण्यात तसेच शिक्षण करण्यात देते. त्या मुलांच्या स्वप्नांना अजून चांगला आकार कसा देता येईल यामध्ये सिंधुताई सतत प्रयत्नशील असतात….!!
सिंधुताई च्या ह्या कार्याला खासरे तर्फे कडक सलाम! माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा…
वाचा शेकडो अधिकारी घडविणारा गुरु रेहमान फी घेतो केवळ ११ रुपये..
Comments 1