परदेशात फिरायची प्रत्येकाची हौस असते परंतु हा प्रवास खर्चिक म्हणून लोक टाळतात परंतु आज खासरे वर अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही. जगातील अतिशय सुंदर आणि स्वस्त देश खालील प्रमाणे आहेत.
थायलंड
थायलंडचे नाव घेताच बीच आणि पार्टी आठवते. येथे तुम्हाला अवघ्या २५० रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच २०० रुपयांत खाणे मिळू शकते. थायलंड हा सुट्ट्या घालविण्याकरिता तुम्हाला एक चांगला पर्याय असू शकतो.
नेपाळ
नेपाळ नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही ६०० रुपयांती तीन वेळा जेवणाची मजा घेऊ शकता. तसेच २७० रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता. भारताला लागुनच असलेला देश नेपाळ हा हि एक चांगला पर्याय आहे.
व्हिएतनाम
स्वस्त खाणे आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ ६६ रुपयांपर्यंत घेता येते. तसेच २०० रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे. चला मग करा व्हीयतनामची तिकीट बुक
चीन
चीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च चीनमध्ये केवळ ६६ रुपये इतका होतो. चीनमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आणि अतिशय खर्चात तुमची सफर होऊ शकते.
इंडोनेशिया
नॅचरल ब्युटीची मजा घ्यायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. इंडोनेशियात तुम्ही केवळ ६७ रुपयांत डिनर करु शकता. तसेच २५० रुपयांत हॉटेल बुक करु शकता. भारतापासून फार लांबही जावे लागणार नाही.
बुल्गारिया
बुल्गारिया ईस्टर्न युरोपमध्ये आहे. खरतंर युरोप, साऊथ-ईस्ट एशिया आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. मात्र बुल्गारियमध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाहीत. तेथे १ लीटर बियर १३० रुपयांत मिळते. येथे तुम्ही ६०० रुपयांत रुम बुक करु शकता.
कंबोडिया
कंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही २५० रुपयांपर्यंत जेवण जेवू शकता. त्यामुळे कंबोडियासुध्दा आपल्याला फिरायला एक चांगले ठिकाण आहे.
पेरु
जगातील कुल आणि मॅजिकल ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही ५०० रुपयांत रुम बुक करु शकता. ३५० रुपयांत तुम्हाला जेवण मिळते. चला तर मग कशाची वाट बघता मग जाऊया फिरायला पेरूला…
What about srilanka5
how is it possible ?.required details about tour of above all countries
yes absolutely right
how can we trust we
that abv information is correct