आज मुंबई मध्ये भयंकर गर्दी असणार्या भागापैकी एक विले पार्ले भाग आहे. १९२९ साली या भागाचे काहीहि अस्तित्व नव्हते. त्यावेळेस हे इराला व पर्ला नावाचे दोन खेडे होते. त्याच साली चव्हाण परिवाराने पारले हि पहिली भारतीय बिस्कीट कंपनी सुरु केली. त्या वेळेस हि कंपनी फक्त दीड एकरात विस्तारली होती. त्यामध्ये हि ४०x ६० फुटाचे एक टिनाचे शेड होते. १९२९ मध्ये जेव्हा भारतमध्ये जेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते आणि देशात स्वदेशी आंदोलन जोर पकडत होते.
भारतात असा माणूस सापडणे कठीण आहे ज्याने पारले जी बिस्कीट खालले नाही आहे. वाचकातहि आत्ता अनेक लोक असे आहे ज्याची चाय हि पारले बिस्कीट शिवाय अपूर्ण आहे. अगदी स्वस्त आणि स्वादिष्ट असे बिस्कीट पूर्ण भारतात लोकप्रिय आहे. सुरवातीच्या काळात येथे फक्त गोळ्या चोकलेट बनत होते. परंतु १९३९ साली या कंपनीने बिस्कीट बनवायला सुरवात केली. आणि आता हि कंपनी संपूर्ण जगावर राज्य करीत आहे.
या कम्पनीचा एकूण व्यवसाय २७,००० करोड रुपयाच्या जवळपास आहे. कंपनीचे संस्थापन चव्हाण हे स्वदेशी आंदोलनात सक्रीय सहभागी होते. त्याचा कापडाचा सुध्दा व्यवसाय होते. पारलेचे कॅटेगरी हेड कृष्णराव सांगतात कि १९२९ साली जेव्हा कंपनी सुरु झाली होती तेव्हा येथे फक्त संतरा कॅन्डी आणि चोकलेट बनविल्या जात होते. कंपनीने ७५,००० रुपयात एक फैक्ट्री विकत घेतली आणि जर्मनी वरून मशीन बोलवून बिस्कीट उत्पादन सुरु केले होते.
१९३९ साली या कंपनीने बिस्कीट बनविण्यास सुरवात केली. आणि तेव्हा या बिस्किटाचे नाव पार्ले ग्लुको बिस्कीट ठेवण्यात आले.
त्या काळात कमी उत्पन्नामुळे बिस्किटे हि गव्हापासून बनत नव्हती तर सतु (जव) यापासून बनत असत. त्या बिस्किटाना वैक्समध्ये टाकून पेपरात गुंडाळल्या जात असे. त्यावेळेस कंपनीने पैकिंग करिता स्वतःची मशीन बनवली होती. वेळेसोबत या बिस्किटाचे नाव ग्लुको पासून पारले-जी हे झाले. १९९६ ते २००६ पर्यंत कंपनीने बिस्किटाच्या किमंतीमध्ये कुठलाही बदल केला नाही. गहू,साखर,दुध इत्यादी वस्तूचे भाव १५० टक्क्यांनी वाढले होते.
२०१३ साली पारले जी ५००० करोडची विक्री करणारा पहिला FMCG प्रोडक्ट ठरला. परंतु GST लागू झाल्यमुळे कंपनी आता उत्पादन कमी करण्याचा विचार करित आहे. कारण आता कोन्फेक्शनरी वस्तू वर १८ टक्के कर लागू झाला आहे. जो पहिले १२ ते १४ टक्के होता. आपल्या भविष्यातील योजनाविषयी सांगताना कृष्णा सांगतात कि कॉन्फेक्शनरीचा व्यवसाय १००० करोडच्या जवळपास आहे आणि १२ टक्के ग्रोथ रेट ने वर चालला आहे. या वर्षी व्यवसायात २०% ने वाढ होईल असे ते सांगतात.
स्वदेशी वस्तूमध्ये जागतिक मार्केट मध्ये तोडीस तोड ठरू शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे पार्ले जी आहे.
लेख आवडल्यास हमखास शेअर करा…
बिस्किटांना व्याक्स मध्ये टाकून ??????????????????? उठा ले रे भगवान उठा ले !