नऊ छोट्या परंतु जगण्यासाठीच्या मोठ्या गोष्ट
कधी कधी फार छोट्या गोष्टीहि एकदम मोठा संदेश देऊन जातात. अश्याच काही छोट्या एका ओळीच्या गोष्टी खासरे वर आपल्याकरिता नक्की वाचा…
१ ) मी ओल्या फरशीवरून घसरलो व माझे डोके आपटले . तेवढ्यात तिथे व्हीलचेअर मधुन एकजण आला व सांगू लागला , विश्वास ठेवा अगर ठेवू नका . पण अगदी असाच मी पडलो आणि पाठीचा मणका हरवून बसलो !
२ ) त्याच्या वडिलानी त्याला सांगितले , गूगल आणि ॲपल हे नवोदितानी चालू केले आणि यशस्वी केले. अनुभवसंपन्न शहाण्यानी तर टायटॅनिक बनविले , जे बुडाले !
३ ) यशस्वी होण्याच्या तीन युक्त्या किंवा मंत्र :अन्य कोणी वाचत नाही ते वाचा. इतर जो विचार करत नाहीत तो करा. काम असे निवडा जे अन्य कोणी केले नाही.
४ ) यशस्वी असणे म्हणजे जेंव्हा तुम्ही भूतकाळात बघता तेंव्हा चेहरा हसला पाहिजे .
५) जोपर्यंत प्रयत्न करणार नाही , तोपर्यंत ते काम तुम्ही करू शकता की नाही हे समजणार नाही .
६ ) एका सुंदर स्त्रीने भर मॉलमध्ये पंचावन्न वर्षांच्या त्याला अचानक मिठी मारली . तिनें सांगितले की ९/११ च्या ट्विन टॉवर इव्हेंट मध्ये बेशुध्द असलेल्या तिला त्याने बाहेर काढले होते .
७ ) मृत्युशय्येवरील आईच्या बेडभोवती माझे वडील , आम्ही तीन भाऊ आणि बायका गोलाकार उभे होतो तेंव्हा आई म्हणाली , आज किती छान वाटतेय . असे जर घरात नेहमी घडले असते तर आज मी हॉस्पिटलमध्ये नसते!
८ ) माझे वडील आज गेले . अतीव आदराने मी माझे ओठ त्यांच्या कपाळावर ठेवले . त्याच क्षणी मला जाणवले की मी लहान होतो त्यावेळी कधीतरी मी असे केले होते . आज चाळीस वर्षानी मी त्यांचा मुलगा झालोय .
९ ) झिंबाव्वेतील एका निर्वासित कॅंपमधील गोष्ट . तो तीन दिवसांचा उपाशी होता . माझ्या हातातील ब्रेड मी त्याला दिला . त्याने तो घेतला , पण अधाशासारखा तोंडाला लावला नाही. त्यातील निम्मा ब्रेड त्याने मला परत केला !