वाराणसीच्या रस्त्यावर एक लहान मुलगा खेळात असे. तो त्याच्या मित्रांसोबत येथे खेळायला जात असायचा. एक दिवस खेळता खेळता तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. त्या वेळी घरी गेल्यावर मित्राचे वडील त्या मुलावर रागावले. त्याला उद्देदेशून म्हटले की, तूझी हिम्मत कशी आहे आमच्या घरी येण्याची?
त्याला कारणही तसेच होते. त्या मुलाचे वडील नारायण जयस्वाल हे रिक्षा चालवण्याचे काम करत असत. तो मुलगा गोविंद जयस्वाल हा रिक्षा चालकाचा मुलगा होता. त्या वेळी गोविंद हे ११-१२ वर्षांचा असल्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी समजल्या नाहीत. गोविंदचे वडील रिक्षा चालवण्याचे काम करत असत.
त्यांचे कुटुंबीय ५ जणांचे असल्यामुळे तेवढ्या पैशात भागवणे अवघड होत असे. जेव्हा गोविंद जयस्वाल यांची मोठी बहीण ममता शाळेत जात असायची तेव्हा लोक तिला टोमणे देत असायची. तेव्हा लोक गोविंद यांना पण लोक टोचून बोलत असायचे. तेव्हा गोविंद हे तुटले नाहीत तर मोठे होऊन त्यांनी काहीतरी बनून दाखवण्याचे ठरवले.
आज आपण आयएएस गोविंद जयस्वाल यांची माहिती पाहणार आहोत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्षाला तोंड दिले. आयुष्यात जे मिळवायचे होते ते त्यांनी हिंमतीच्या बळावर मिळवले. लहानपानापासून त्यांनी जे बनण्याचा प्रयत्न केला होता ते त्यानी बनून दाखवले.
त्यांच्या मनात लहानपणी काहीतरी बनून दाखवण्याचे ध्येय होते. खेळण्याच्या वयात गोविंद यांनी लेखन आणि वाचन करून कालेकतर बनवण्याचा प्रवास सुरु केला. गोविंदने लहानपणापासून मोठे बनवून दाखवण्याचा मनाशी गाठ बांधली होती . गोविंद कानात कापूस घालून अभ्यास करत असायचे.
कारण कानात कापूस घातला की त्यांना शेजारच्या घरात चालू असणाऱ्या मशीन आणि जनरेटरचा आवाज येत नसायचा. शासकीय शाळा आणि महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर गोविंद पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेले. वडिलांनी गोविंदाच्या शिक्षणासाठी वाराणसीत असणारी जमीन विकली.
वडिलांनी गोविंदाला ४० हजार रुपये देऊन दिल्लीला पाठवले. दिल्लीत आल्यानंतर गोविंदने पण अर्ध्ये पैसे खर्च केले. पैसे वाचवण्यासाठी गोविंद एक वेळेलाच जेवत असत. वयाच्या २२ व्या वर्षी गोविंदने यूपीएससी परीक्षा पास केली. गोविंद त्याच्या आयुष्यात अब्दुल कलाम यांना आदर्श मानतो.