आपल्या देशातील हजारो तरुण-तरुणी दरवर्षी आयएएस परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे हेच या विद्यार्थ्यांचे लक्ष असते. बरेच उमेदवार हे अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेले असतात. यूपीएससीद्वारे दरवर्षी घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक आहे.
केरळच्या इरोड जिल्ह्यातील एका अत्यंत गरीब घरातील मुलीने जीवनात अत्यंत संघर्ष करत युपीएसीची सर्वात कठीण परीक्षा पास होऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सी.वनमती असे या मुलीचे नाव आहे. वनमतीच्या घरची परिस्थिती सुरवातीपासूनच अत्यंत गरीब होती. अगदी लहानपणापासूनच शाळेत जाण्याच्या वयात, अभ्यासाबरोबरच त्यांना घरातील कामात अर्थात पशुपालनात हातभार लावावा लागला. वनमती स्वतः लहानपणी म्हैस चरायला घेऊन जात असे.
घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने वनमतीने परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य आपल्या उराला बाळगले होते. ती म्हशींना चरायला घेऊन जाताना सोबत पुस्तकं नेत असायची आणि अभ्यास करत असायची. बारावीची परीक्षा झाल्यावर वनमती वर लग्न करण्यासाठी घरच्यांनी दबाव टाकला होता.
या दरम्यान वनमती ने एकदा गंगा यमुना सरस्वती नावाची एक मालिका पाहिली, ज्यात नायिका एक आयएएस अधिकारी आहे. त्यानंतरच वनमती ने ठरवले होते की तिलाही आयएएस अधिकारी व्हायचे आहे.
आयएएसची तयारी सुरू करण्यापूर्वी तिने आपला अभ्यास पूर्ण केला होता. तिने संगणक अनुप्रयोगात उच्चपदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर घरगुती खर्चात मदत करण्यासाठी एका खाजगी बँकेत नोकरीही मिळवली. यानंतर तिने घरात मदत करण्यास सुरुवात केली, पण ती आपले ध्येय विसरली नाही, म्हणून तिने यूपीएससीची तयारी सुरू केली.
युपीएसी परीक्षेची तयारी करताना प्रथमच ती नापास झाली, शेवटी वनमती ने २०१५ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. परीक्षेला जाण्याआधी वनमती चे वडील आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वनमती ने वडिलांची काळजी घेताना रुग्णालयातून मुलाखत दिली होती.