आजकाल आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न अनेकजण बाळगत असतात. मात्र आयएएस, आयपीसी ही परीक्षा जगातील सर्वात कठीण समजल्या परीक्षांपैकी एक परीक्षा आहेत. या परीक्षेत प्रत्येकाचं नशीब आणि मेहनत साथ देईलच असं नाही. त्यामुळे अनेक जण या परीक्षा देत असताना अपयशी होतात. दरवर्षी १०० टक्क्यांपैकी फक्त ५ ते ६ टक्केच मुलं या परीक्षांमध्ये यश मिळवत असतात.
पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा क्रॅक करण्यासाठी अपार मेहनत आणि नशीबच लागते असे म्हणावे लागेल. कारण १०० टक्क्यांपैकी ५ ते ६ टक्के उमेदवार वर्षानुवर्षे मेहनत करून ही परीक्षा क्रॅक करतात तर पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्रॅक करणारे अत्यंत नगण्य म्हणजेच १ टक्के मुलं असतील.
पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा क्रॅक करणाऱ्यांपैकी एक उमेदवार आहेत ज्यांचे नाव आहे सुरभी गौतम. सुरभी गौतम यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा म्हणजेच युपीएसी २०१६ मध्ये ५० वा क्रमांक मिळवला होता.
सुरभी गौतम या मूळच्या मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील आमदरा गावातील आहेत. आमदरा हे छोटेसे असे खेडेगाव आहे. शाळेत असतानापासूनच सुरभी या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. इयत्ता १०वी आणि १२वी मध्ये सुद्धा त्यांनी कोणत्याही बाहेरील मदतीशिवाय आणि मर्यादित संसाधनांशिवाय ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. सुरभीचे वडील व्यवसायाने वकील तर आई शिक्षिका आहे.
बारावीनंतर लगेचच, सुरभीने राज्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत यश मिळवले. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणारी ती तिच्या गावातील पहिली मुलगी होती. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंगची पदवी भोपाळमधून पूर्ण केली.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्यापूर्वी सुरभीने बीएआरसीमध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. तिने गेट, इस्रो, सेल, एमपीपीएससी पीसीएस, एसएससी सीजीएल, दिल्ली पोलीस आणि एफसीआय परीक्षांनाही तडा दिला होता . तिने २०१३ मध्ये झालेल्या आयईएस परीक्षेत एअर १ क्रमांक मिळवला आहे.
सुरभी गौतम आपल्या एका मुलाखतीत सांगतात की, आयुष्यभर चांगले ग्रेड मिळूनही कॉलेजमध्ये इंग्रजी नीट इंग्रजी बोलता येत नव्हती. यावरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. कठोर परिश्रम करून इंग्रजी देखील बोलायला शिकले आणि यूपीएसी देखील पास झाले असं सुरभी गौतम यांनी म्हटलं आहे..