मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे निर्माते म्हणून ओळखले जाते. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून त्यांनी मुस्लिमांसाठी पाकिस्तान नावाचा वेगळा देश निर्माण करण्याची मागणी लावून धरली. अखेर जीनांच्या मागणीला यश मिळाले आणि वेगळा पाकिस्तान देश बनवण्यात ते यशस्वी झाले. परंतु याबाबतीत जरी त्यांना यश मिळाले असले तरी भारत सोडून जात असताना ते आपल्या तीन अनमोल गोष्टी पाकिस्तानात घेऊन जाऊ शकले नाहीत. कोणत्या होत्या त्या अनमोल गोष्टी ?
१) जीनांनी आपली लाडकी पत्नी गमावली : मुंबईत वकिली करत असताना दिनशॉ मानेकजी पेटिट नावाचे एक श्रीमंत पारशी व्यापारी जीनांचे क्लाईंट होते. दिनशॉ यांची मुलगी रत्तनबाई जीनांना फार आवडायची. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे, पण धार्मिक सीमा दोघांच्या लग्नात आडवी आली. पण रत्तनबाईने धर्म परिवर्तन करुन जीनांशी लग्न केले. त्यांना एक मुलगीही झाली. परंतु काही काळानंतर रत्तनबाईंचा कॅन्सरने मृत्यू झाला. जीनांना आपली पत्नीची कबर आणि आठवणी भारतातच सोडून जाव्या लागल्या.
२) जीनांची लाडकी मुलगीही गेली दूर : हा योगायोग म्हणता येईल किंवा काळाचा बदल, जीनांची मुलगी दीना हिला नेविल वाडिया नावाच्या एका पारशी उद्योगपतीसोबत प्रेम झाले. त्यांच्या लग्नाला जीनांची परवानगी नव्हती. जीनांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने मुस्लिम व्यक्तीसोबत विवाह करावा. त्यांनी ही गोष्ट मुलीला बोलूनही दाखवली. पण त्यांच्या मुलीने त्यांचे ऐकले नाही आणि वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले. जीनानां पाकिस्तानात जाताना आपल्या मुलीला इथेच भारतात सोडून जावे लागले.
३) जीनांनी आपले आवडते घरही गमवावे लागले : मुंबईचा सर्वात पॉश एरिया असणाऱ्या मलबार हिल भागात “जीना हाऊस” नावाचा जीनांचा आलिशान बांगला होता. हा बंगला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानानजीक आहे. १९३६ साली त्याचे बांधकाम करण्यात आले होते. अडीच एकर क्षेत्रात हा बांगला पसरला आहे. या बंगल्याच्या कामात इंग्लंडमधील संगमरवर आणि अक्रोडाच्या लाकडाचा वापर करण्यात आला होता. हा बंगलाही जीनांना भारतातच सोडून जावा लागला.