अर्णव गोस्वामी सध्या १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. अर्णवने पोलिसावर अनेक आरोप केले परंतु कोर्टाने व्हिडीओ आणि मेडिकल रिपोर्टच्या आधारावर त्याचा हा दावा मोडून काढला आहे. यामध्येच एक फोटो वायरल झाला आहे हा फोटो अर्णव गोस्वामीला पोलिसांच्या बाबुरावचा प्रसाद मिळाला म्हणून अनेक जण शेअर करत आहे.
हा फोटो मध्ये पोलीस आरोपीला प्रसाद देताना दिसत आहे. दोन पोलीस पाय पकडून आहे तर एक त्याला बाबुरावने प्रसाद देताना दिसत आहे. परंतु फोटोची क्वालिटी वाईट असल्याने हा फोटो नक्की अर्णव गोस्वामीचा आहे का ? हे कोणाला माहिती नाही.
याकरिता आम्ही गुगल इमेज सर्चचा आधार घेतला. गुगल इमेज सर्च मध्ये ज्याप्रमाणे आपण गुगलवर माहिती शोधतो त्याप्रमाणे आपण फोटो या मध्ये शोधू शकतो. अनेकदा मूळ फोटो कोठून शेअर झाला हे या प्रक्रीयेद्वारा माहिती होते. आपण सुध्दा पीसी अथवा मोबाईल वर गुगल इमेज सर्च इंजिन वापरू शकता. गुगल प्रमाणे अनेक इमेज सर्च हे काम करतात.
फोटो पोलीस स्टेशन मधील आहे. त्यामुळे अनेकांना वाटले कि हा फोटो अर्णवचा असावा परंतु गुगल वर माहिती घेतल्यास हा फोटो वेगळ्याच ठिकाणचा निघाला आहे. हा फोटो १० जानेवरी २०२० चा असून उत्तर प्रदेश मधील लखनौ येथील आहे.
सदर व्हिडीओ उत्तर प्रदेश मधील आहे आणि फोटोमध्ये ज्याला प्रसाद मिळाला तो मोबाईल चोर आहे. हा व्हिडीओ त्यावेळेस वायरल झाला होता आणि बरीच खळबळ या व्हिडीओ मुळे उडाली होती. परंतु अर्णव आणि या व्हिडीओचा दूरदूर पर्यंत संबंध नाही आहे.
त्यामुळे सोशल मिडीयावर माहिती शेअर करताना ती सत्य आहे का नाही हे बघावे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.