अनेक भारतीय अमेरिकेत जाऊन सेटल होतात आणि परत इकडे येत नाही. परंतु या उलट काही केले आहे हैद्राबाद येथील माधवी आणि वेणुगोपाल यांनी, देशात कुठेही जा प्लास्टिक किंवा थर्मोकॉलच्या प्लेट आपल्याला दिसणार. या प्लेट पर्यावरणा सोबत आपल्या शरीराला सुध्दा घातक आहे.
आपली संस्कृतीत पत्रवाळी हा अविभाज्य भाग राहिला आहे. परंतु कालानुरूप हि प्रथा पत्रवाळी दिसणे बंद झाले. याच संधीचा फायदा घेत माधवी आणि वेणुगोपाल यांनी २०१९ मध्ये “वीसत्राकू” नावाची एक नवीन कंपनी सुरु केली. वीसत्राकू तेलगु भाषेत पत्रवाळीला म्हटल्या जाते.
त्यांचा हा प्रवास देखील चित्तथरारक आहे. त्यांना हि कल्पना सोसायटी मध्ये झालेल्या कार्यक्रमा नंतर प्लास्टिक ताटाचा खच पाहून सुचली. माधवी आणि वेणुगोपाल यांच्याकडे २५ एकर शेती आहे. ज्यामध्ये त्यांनी ३० हून अधिक प्रकारचे फळझाडे लावले आहे. त्यांच्या शेतात पळसाची देखील मोठमोठी झाडे आहे. पळसाच्या पानापासून पत्रवाळी बनवतात. त्यांनी बनविण्याचा प्रयत्न केला परंतु याचा आकार लहान होता.
थोडे संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात आले कि ओरिसा येथील आदिवासी समाज जुन्या पद्धतीने पत्रवाळी बनवितात. तिथे यांना खलीपत्र असे म्हणतात. इथे त्यांनी काम सुरु केले. आता त्यांचे प्रोडक्ट भारतातच नाही तर अमेरिका, जर्मनी इत्यादी देशात जात आहे. या अगोदर माधवी फार्मसी आणि जेनेटिक्स मध्ये मास्टर पूर्ण केले होते आणि वेणू मैकेनिकल इंजिनियर होता. त्यांनी मलेशिया,बँकॉक,सिंगपुर आणि अमेरिकेत काम देखील केले आहे.
२००३ साली दोघे परत भारतात आले आणि यावेळेस त्यांनी जमीन घेतली. सध्या त्यांच्या या व्यवसायात १० मुली काम करतात आणि रोज ७ ते १० हजार प्लेट आणि कटोरी इथे बनविल्या जाते. या सर्व पानांना फूड ग्रेड धाग्याने शिवल्या जाते. आणि मशीन चे तापमान ६० ते ९० डिग्री ठेऊन त्यांना प्रेशरने आकार दिल्या जातो. मागील वर्षी या दोघांनी १० लाख रुपयाचा निव्वळ नफा कमविला होता. एका वर्षात हा नफा चांगला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास आव्ह्स्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.