लहानपणी तुम्ही मोठ्या बुजुर्ग लोकाकडून ऐकले असेल कि या झाडाची फळे खाऊ नये, किंवा या झाडाखाली झोपू नये. परंतु या मागचे कारण वेगळे सांगितले जाते कि भूत असतो, चेटकीण असते इत्यादी. परंतु असे एक पृथ्वीवर झाड आहे ज्या खाली झोपल्यास किंवा फळ खाल्यास तुमचा जीव जाऊ शकतो.
या झाडाचा प्रत्येक भाग विषारी आहे त्यामुळे या झाडापासून सगळे दूर राहतात. या झाडाच्या सावलीत देखील कोणी उभे राहत नाही. या झाडाच्या फळांना “छोटे मृत्यूचे सफरचंद” देखील म्हटल्या जाते. या झाडावर अनेक संशोधन सुरु आहे. या झाडाचे नाव मंचनील वृक्ष असे आहे.
फ्लोरिडा इंस्टिट्यूट ऑफ फूड अँन्ड अँग्रिकल्चर सायन्सच्या संशोधना नुसार या झाडातून निघणारे दुध हे शरीराच्या संपर्कात शरीराची मोठ्या प्रमाणात आग होते. पावसाळ्यात या झाडाखाली उभे राहल्यास मृत्यू होऊ शकतो.
या झाडाचे लाकूड जाळल्यास निघणारा धूर डोळ्यात गेल्यास डोळे सुजतात कधी कधी अंधत्व देखील येऊ शकते. यामुळे आपण कल्पना करू शकता कि हे झाडी किती भयंकर असेल. या झाडाच्या फळाचे सेवन केल्यास उलटी, रक्तस्त्राव इत्यादी होऊन मृत्यू होतो.
या झाडाचं नाव मंचीनील ट्री म्हणून ओळखलं जातं. मात्र या झाडाचं फळ मृत्यूच फळ म्हणून प्रसिद्ध आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वाधिक धोकादायक झाड मंचीनील आहे. सध्या या झाडावर संशोधन सुरु असून यापासून औषधीय गुणधर्म असल्या बाबत काही वैज्ञानिकाचे म्हणणे आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasr.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.