कोरोनाच्या भीतीमुळे जिथे संपूर्ण जग घरात लपून बसून आहे. परंतु आजही असे काही गाव आहे ज्यांना बाहेरील जगातून काहीही घेण्याची आवश्यकता नाही आहे. काही आदिवासी संस्कृती आजही टिकून आहे आणि या संस्कृती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. सातपुडाच्या जंगलात आजही अनेक आदिवासी लोक राहतात.
पाताळकोट नावाची एक जाग सातपुडाच्या जंगलात आहे. इथे शेकडो वर्षापासून असा एक आदिवासी समाज राहतो जो खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहे. त्यांना फक्त मीठ घेण्यासाठी बाहेरच्या जगासोबत संपर्क करावा लागतो. चिंदवाडा जिल्हाच्या मुख्यालयापासून ७८ किमी दूर सातपुडा पहाडाच्या मध्ये असे अनेक जंगल आहे ज्यांची माहिती आजही अनेकांना नाही. इथेच १७ फुट खाली पाताळकोट आहे.
पातळकोट समुद्रसपाटी पासून ७५० ते ९५० मीटर उंचीवर स्थित आहे. ७९ वर्ग किलोमीटर एवढ्या परिसरात हे जंगल पसरलेले आहे. इथे भरिया आदिवासी समाज राहतो तो , मध्य प्रदेश मध्ये बैगा, सहरिया आणि भारीया हे तीन आदिवासी जाती आढळतात. इथे भारीया आदिवासी समाजाचे १२ गाव आहे. पाताळकोट येथील लोक आपल्या आवश्यकता निसर्गाच्या माध्यमातून पूर्ण करतात.
काही वर्षअगोदर इथे जायला रस्ता देखील नव्हता. डोंगर दर्यातून, झाडाचा आधार घेत इथे जाव लागत असे. सध्या इथे जाण्यास रस्ता झाला आहे. इथे इलाज देखील जडी बुटी पासून केल्या जातो. सर्पदंश असो कि प्रसूती सर्व इलाज गावातच केले जातात. ढाक, सागवान,मोह,आवळा, चीरोन्जीचे इथे मोठ मोठे जंगल आहे. पुरातन कथे नुसार रामायणातील पात्र रावणाचा मुलगा मेघनाथ हा भगवान शंकराची आराधना करायला याच रस्त्याने पाताळात गेला असे सांगण्यात येते.
प्रकाश खाली कमी येत असल्याने इथल्या झाडाचे आकार देखील वेगळे झाले आहे. पहाडातून येणारे पाणी मिनरल वॉटर पेक्षाही सुंदर आहे हेच पाणी इथे साठवून ठेवल्या जाते. मातीचे घर असलेले हे गाव कुलर किंवा एसी पेक्षाही घरे थंडे आहे. इथे तेल देखील काही बियातून काढले जाते आणि हे तेल साबण आईन सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी वापरण्यात येते. इथे वेगळ्या प्रकारचे मध देखील मिळते ज्याला रॉक हनी असे म्हणतात. या मधामुळे चष्म्याचा नंबर चालला जातो असे सांगण्यात येते.
पाताळकोट मध्ये २२० प्रकारची जडीबुटी आढळते. आणि शेकडो प्रकारच्या रानभाज्या इथे आढळते. कधी वेळ भेटल्यास अवश्य या गावाला भेट द्या. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.