माणसाचे दात हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे परंतु योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अचानक दात पिवळे होतात आणि यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील फरक पडतो. दात पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने विक्रीस आहे परंतु दातांना पिवळेपणा का येतो ? याचा कधी आपण विचार केला आहे का ?
जर आपण नेमका पिवळेपणा का येतो याचे कारण माहिती पडल्यास आपण हा धोका टाळू शकता. सर्वप्रथम हि समस्या अनुवांशिक देखील असू शकते कारण घरातील पुर्वजाचे दाता पिवळे असतील तर आपले देखील दात पिवळे होऊ शकतात. दातावरील बाह्य स्तर पातळ असेल तर दाताचा पिवळेपणा दिसतो.
वयानुसार दाताचा इनॅमलचा स्तर हा पातळ होतो त्यामुळे देखील दातांना पिवळेपणा येऊ शकतो. वय देखील दाता करिता एक महत्वाचा मुद्दा आहे. कॉफी, चहा, तंबाकू इत्यादी गोष्टीमुळे देखील दाताना पिवळेपणा येतो त्यामुळे दिवसातून दोनदा घासणे आवश्यक आहे. दातावर कीटन जमा झाल्याने देखील दात पिवळे होऊ शकतात.
दातांमध्ये चांदी भरल्याने देखील दात पिवळे पडतात. केमोथेरपी मध्ये देखील दात पिवळे पडतात. तसेच गर्भवती स्त्रीला आजार किंवा संसर्ग झाल्यास बाळाच्या दातावर त्याचा कालांतराने परिणाम जाणवतो.
अन्नपदार्थ देखील दात पिवळे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. चहा, कॉफी, कोला, चेरी, ब्लुबेरी, सफरचंद आणि बटाटे खाल्ल्याने देखील दात पिवळे होतात. या पदार्थामुळे दातावरील इनॅमल स्तर कमी होतो.
पाण्यामधून फ्लोराईड हा घटक शरीरात गेल्यास दात पिवळे होतात. लहान मुलांनी टुथपेस्ट किंवा फ्लोराईडयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास दात पिवळे होतात. अचानक कधी झालेल्या अपघाताने देखील दात पिवळे होऊ शकतात.जोरदार आघातामुळे दाताच्या आतील स्तरामध्ये रक्तप्रवाह होऊ शकतो. त्यामुळे दातांचा इनॅमलचा स्तर कमकुवत होऊ शकतो.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.