सोशल मीडियात अचानक लोक वायरल होतात आणि सर्व लोक मोठ्या मानाने मदत करतात. राणू मोंडल देखील याचे एक उदाहरण आहे. परंतु या मागे कोणी शहनिशा करत नाही. अनेक वेळेस मदत खऱ्या मालकास न मिळता काही वेगळा प्रकार घडतो. बाबाजी का ढाबा , दिल्ली मालवीय नगर मधील एक वयस्कर आजी आणि आजोबा
जेवायला अगदी चांगली सेवा देऊन देखील त्यांना गिर्हाईक मिळत नव्हते. एक दिवस “स्वाद ऑफिशियल” या युट्युब चैनेलवर त्यांचा व्हिडीओ येतो आणि रातोरात आजी आजोबा प्रसिद्ध होतात. दुसऱ्या दिवशी आजोबाच्या दुकानासमोर लोकांच्या रांगा लागतात अनेक मोठ मोठे नेते, अभिनेता तिथे जाऊन त्यांना मदत करतात. यामध्ये जे लोक पोहचू शकले नाही त्यांनी ऑनलाईन मदत देखील केली.
हा व्हिडीओ रविना टंडन, रणदीप हुडा, सोनं अहुजा, अश्विन अश्या अनेक सेलिब्रिटीने देखील शेअर केला व त्यांना मदतीचे आव्हान केले. zomato, स्वीगीने देखील यांना मदतीचे आव्हान केले. परंतु या सर्वामध्ये आज युट्युबवर लक्ष चौधरी यांनी यांनी एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये मदतीचे तथ्य पुराव्या सहित दाखविलेले आहे.
स्वाद ऑफीशीअल चालवणारे गौरव यांनी स्वतःचा अकौंट नंबर व्हिडीओ मध्ये शेअर केला होता व बाबाजीने या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे कि त्यांना रुपया देखील मिळाला नाही. खाली आपण हा व्हिडीओ बघू शकता.
या व्हिडीओ मध्ये लक्ष्य सांगतो कि बाबा का ढाबा व्हिडीओ बघून काही तासातच २.२५लाख जमा झाले होते. त्या नंतर किती पैसे जमा झाले या बाबत कोणाला माहिती नाही व बाबा का ढाबा वाले आजोबा सांगतात कि त्यांना एक रुपया देखील गौरव कडून मिळाला नाही. त्यांना जी रोख स्वरुपात पैसे मिळाले होते आणि त्यांनी ते स्वतःच्या खात्यात जमा केले ते खाते बँकने तात्पुरते बंद केले आहे.
संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर आपणास हे प्रकरण समजणार व आपली फसवणूक झाली हे लक्षात येणार. त्यामुळे या पुढे ऑनलाईन मदत करताना हजार वेळा विचार करून संपूर्ण शहनिशा करून मदत करण्यात यावी.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.