भारतात पाश्चात्य देशातील संस्कृती लोकांना आता खूप आवडायला लागली आहे. तेथील अनेक गोष्टी आता इकडे लोक करताना दिसतात. लिव्ह इन मध्ये राहण्याचा प्रकार पण भारतात तास नवीन आहे. पण मागील काही काळात यात वाढ झाली आहे. खासकरून बॉलिवूडचे सेलेब्रिटी लिव्ह इन मध्ये राहताना आपल्याला दिसतात. यामध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. लग्न न करता आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहणाऱ्या या अभिनेत्री खूप बोल्ड देखील आहेत.
सिनेजगतातील आयुष्य तसे खूप वेगळे असते. येथे लवकर रिलेशन बनतात तर तेवढ्याच लवकर ते तुटतात देखील. आज अशाच या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ ज्या लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहतात.
माही गिल-
१९ डिसेंबर १९७५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेली माही गिल गोव्याच्या आपल्या बिझनेसमॅन बॉयफ्रेंड सोबत राहते. ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. माहीचे खरे नाव रिम्पी कौर आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात पंजाबी सिनेमामधून केली होती. बॉलिवूडमध्ये तिने देव डी, दबंग, नॉट अ लव स्टोरी, साहेब बीवी और गैंगस्टर आणि पान सिंह तोमर सारख्या मोठ्या सिनेमात काम केलं आहे.
एमी जॅक्शन- अभिनेत्री एमी जॅक्शन आपल्या विदेशातील प्रेमी जॉर्ज पैनीयातो सोबत राहते. नुकतंच तिने एका मुलाला देखील जन्म दिला आहे. जॉर्ज आणि एमीचा साखरपुडा झाला असून दोघांनी लग्न मात्र केलं नाही. या दोघांची भेट २०१५ मध्ये लंडनमध्ये झाली होती. जॉर्जचे वडील हे अरबपती असून ते ऍबिलिटी ग्रुपचे संस्थापक आहेत. एमीने २.० मध्ये काम केलं आहे.
मुग्धा गोडसे- मुग्धा गोडसे बॉलिवूडचा अभिनेता राहुल देव ला डेट करते. दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. मुग्धा आणि राहुल ५ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. दोघांनी अजून लग्न केलं नसून ते लिव्ह इन मध्ये राहतात. मुग्धाने फॅशन, कॅलेंडर गर्ल सारख्या सिनेमात काम केलं आहे.
सुश्मिता सेन-
मिस युनिव्हर्स राहिलेली सुश्मिता सेन आपल्या युके मध्ये स्थायिक झालेल्या बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहते. सुष्मिताला तिच्यापेक्षा कमी वयाचे मुलं आवडतात. रोहमन देखील लहान असल्याने तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले पण तिला काही याचा फरक नाही पडला.
सुश्मिताने अनेक मोठ्या सिनेमात काम केलं आहे. सुश्मिताने तीन मुलींना दत्तक देखील घेतलेले आहे. एका मुलीचे तिने लग्न केले आहे तर दोघी सोबत राहतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.