बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर सतत राज्य केले. परंतु या झळाळी मागे त्या आपले वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देऊ शकल्या नाही. पडद्यावर कोणाची प्रेमिका तर कोणाची पत्नी परंतु आयुष्यात त्या आज देखील एकट्या आहे. आम्ही तुम्हाला अश्या अभिनेत्री विषयी माहिती देणार ज्यांच्या आयुष्यात पैसा, नाव कशाची कमी नाही परंतु त्यांनी आयुष्यात एकट राहायचा निर्णय घेतला आहे. आज देखील त्या अविवाहित आहे.
१. सुश्मिता सेन- सुश्मिता सेन यांचे वय ४४ वर्ष एवढे आहे परंतु त्यांनी आज देखील लग्न केले नाही आहे. त्यांना दोन मुली आहे या दोन्ही मुली त्यांनी दत्तक घेतल्या आहे. सुश्मिता सेन या मिस युनिवर्स देखील आहे. सिंगल मदर म्हणून या दोन मुलींचे सुश्मिता पालन पोषण करत आहे. मागे अनेक लोकांचे म्हणणे आले होते कि सुश्मिता रोहमन शॉल सोबत लग्न करणार आहे परंतु त्यांनी अजून देखील हा निर्णय घेतला नाही आहे.
२. तब्बू- वयाच्या ४८ व्या वर्षी तब्बू अविवाहित आहे. राष्ट्रीय पुरस्कारासोबत अनेक पुरस्कार तब्बूला मिळाले आहे. तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडण्यात आले होते परंतु त्या सर्वाचे लग्न झाले आणि तब्बू आज देखील अविवाहित आहे.
३. आशा पारेख- बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध जुन्या अभिनेत्री पैकी एक आशा पारेख आहे. त्यांच्या बायोग्राफीमध्ये त्यांनी लिहले आहे कि त्यांना लग्ना करिता कुठल्याच मुलाने प्रपोज केला नाही त्यामुळे त्या आयुष्यभर अविवाहित आहे. त्यांनी हे देखील कबूल केले कि त्यांचे प्रेम दिग्दर्शक नसीर हुसैन यांच्यावर होते.
४. सुलक्षणा पंडित- बॉलीवूड मध्ये सुलक्षणा पंडित हे देखील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे प्रेम संजीव कुमार यांच्यावर होते परंतु दोघाचे जमले नाही त्यामुळे नंतर आयुष्यभर सुलक्षणा पंडित अविवाहित राहिल्या.
5. नगमा- या देखील बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. साउथ मध्ये त्यांचे अनेक हिट सिनेमे आहे. नगमाचे नाव सौरभ गांगुली सोबत जोडण्यात आले होते परंतु ती आयुष्यभर अविवाहित राहिली.
६. अनु अग्रवाल- अनेकांना हे नाव आठवणार नाही परंतु आशिकी सिनेमातील राहुल रॉय सोबत दिसणारी अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल आहे. एका अपघातात तिचा चेहरा बिघडला आणि त्या नंतर तिने आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.