केरळ विमान अपघातातील शहीद दीपक साठे यांनी सैन्यात सेवा दिली आहे. त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले होते. इयत्ता १० वी व ११वी त्यांनी आपले शिक्षण देहरादून येथील कैंब्रियन हॉल स्कूल येथे पूर्ण केले. ट्रेनिंगच्या दरम्यान त्याने ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर, ( मानाची तलवार ) या मुख्य बक्षिसाबरोबरच एयरफोर्स मधील सलग आठ बक्षीस मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन ठरले.
दीपक साठे 1981 मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी पुण्यातील एनडीएमधून प्रशिक्षण घेतलं होतं. 2003 पर्यंत त्यांनी लढाई वैमानिक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर निवृत्ती घेऊन ते एअर इंडियात कार्यरत होते. अनेक मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेतला. या दरम्यान त्यांचा मोठा अपघातही झाला होता, पुढे लष्करातून निवृत्ती घेऊन ते एअर इंडियात पायलट म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील कैप्टन वसंत दामोदर साठे यांची १९६६ मध्ये देहरादून येथे पोस्टिंग झाली. त्यांचे दोन्ही मुल देहरादून येथे शिकले.
दीपक साठे हे मुंबईला तर आई वडील नागपूरला राहतात. आठ तारखेला आई नीलाचा वाढदिवस असल्याने ते सरप्राइज म्हणून नागपूरला जाणार होते. परंतु दुर्दैवाने केरळमधील कोझिकोड विमानतळावर त्यांच्या विमानाला अपघात होऊन ते शहीद झाले. परंतु साठे कुटुंबाने देशासाठी या अगोदर देखील देशासाठी बलिदान दिले आहे. दीपक साठेंचा मोठा भाऊ विकास साठे हे सुद्धा लष्करात लेफ्टनंट होते. ते देखील देशासाठी शहीद झाले.
आई निला व वडील वसंत साठे आपल्या दोन्ही मुलांचे बलिदान दिले. टीव्हीसोबत बोलताना आई नीलाताई म्हणाल्या, आम्हाला प्रसिद्धी नको आहे, मुलं गेल्याचे दुःख आहे, मात्र त्यांनी देशासाठी, समाजासाठी बलिदान दिले याचा अभिमानही आहे. दीपक यांच्या पाठीमागे पत्नी सुषमा आणि दोन मुले धनंजय आणि शंतनु जे आयआयटीमधून इंजिनिअर झालेले आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.