अनेक बॉलीवूड अभिनेता, अभिनेत्री आपल्या नावासमोर आडनाव लावत नाही किंवा अनेकांनी आपले खरे नाव बदलले आहे. परंतु त्यांचे खरे नाव काय आहे हे अनेकांना माहिती नाही व नाव बदलायचा निर्णय त्यांनी का घेतला हे देखील माहिती नाही. रणवीर सिंह, गोविंदा, काजोल, तब्बू, रेखा यांची नावे आपण नेहमी एकतो पण त्यांची आडनाव काय आहे हे माहिती नाही.
रणवीर सिंह याचे संपूर्ण नाव रणवीर सिंह भावनानी असे आहे. बॉलीवूड मध्ये एवढे लांब नाव योग्य वाटणार नाही म्हणून त्यांनी आपले शेवटचे आडनाव काढून टाकले. काजोल हि गुणी अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगनची पत्नी आहे. परंतु तिचे पूर्ण नाव हे “काजोल मुखर्जी” असे आहे. काजोल हि अभिनेत्री तनुजा आणि निर्माता सोनू मुखर्जी यांची मुलगी आहे. तिच्या नावासोबत तिच्या वडिलाचे नाव कमीच जोडल्या जाते.
रेखा हि बॉलीवूड मधील एव्हरग्रीन सौंदर्याची राणी आहे. रेखाचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन असे आहे. हिंदी सिनेमा करिता हे नाव योग्य वाटत नसल्याने तिने आपले नाव बदलले. यानंतर प्रसिद्ध अभिनेता गोविंदा त्याचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहूजा असे आहे. त्याच्या मते गोविंदा हे नाव सोपे आणि लक्ष ओढून घेणारे आहे त्यामुळे त्याने आपले नाव फक्त गोविंदा म्हणून प्रसिद्ध केले.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असीन हिचे आडनाव थोडे कठीण आहे तिचे संपूर्ण नाव असिन थोट्टूमकल असे आहे. आडनाव बोलायला कठीण असल्याने तिने आपले नाव फक्त असीन असे प्रसिद्ध केले. तब्बू आजही अविवाहित आहे आणि तिचे पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असे आहे. आपल्या नावाचे छोटे स्वरूप तब्बू म्हणून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. जितेंद्र हे बॉलीवूड गाजवणारे अभिनेता त्यांचे खरे नाव रवी कपूर हे आहे.
श्रीदेवी आज आपल्यात नाही परंतु तिच्या आठवणी आहे श्रीदेवीचे संपूर्ण नाव श्रीअम्मा यांगर अयप्पन असे आहे. बॉलीवूड करिता हे नाव कठीण असल्याने तिने आपले नाव श्रीदेवी असे ठेवले. शान हा प्रसिध्द गायक आहे त्याचे संपूर्ण नाव शांतनू मुखर्जी हे आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.