प्रतिष्ठा देवधर दिल्ली विद्यापीठात श्रीराम कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. यावर्षी तिचे पदवीचे शेवटचे वर्ष आहे परंतु पुढील शिक्षणाकरिता तिला चक्क ऑक्सफर्ड विद्यापीठा कडून बोलवणी आली आहे. खास गोष्ट तर हि आहे प्रतिष्ठा भारतातील पहिली व्हीलचेअर वर असणारी ऑक्सफर्ड जाणारी पहिली मुलगी होणार.
मास्टर्स इन पब्लिक पॉलिसी मध्ये पुढील शिक्षणा करिता ती ऑक्सफर्ड मध्ये शिकायला जाणार आहे. तिचे क्लासेस २४ सप्टेंबर २०२० पासून सुरु होणार आहे. प्रतिष्ठा मूळ पंजाब ची आहे, होशियारपूर येथे तिने होस्टेल मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १३ वर्षाची असताना तिचा अपघात झाला आणि त्यानंतर तिच्या मणक्याला झालेल्या दुखापती मुळे ती अपंग झाली.
आयसीयु मध्ये ती तब्बल ४ महिने होती त्यानंतर ४ वर्ष बेडवर तिचे जीवन होते. ३ वर्ष तिने घरातूनच अभ्यास केला आणि तिला दहावी व बारावीच्या परीक्षेत तिला तब्बल ९०% पेक्षाही अधिक मार्क पडले आहे. तिचे म्हणणे आहे कि शिक्षणामुळेच तिला तिच्या या परिस्थितीवर मात करता येणार.
यानंतर तिने श्रीराम कॉलेज मध्ये पुढील शिक्षणा करिता प्रवेश घेतला आणि आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. ऑक्सफर्ड विद्यापीठ जगातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. याची स्थापना हजार वर्षापूर्वी झाली होती. १०९६ पासून लोक इथे शिक्षण घेत आहे. या विद्यापीठाचे नाव येथील शहरावरून ठेवण्यात आले होते. या विद्यापीठात ३९ कॉलेज आहे. या विद्यापीठाची प्रेस हि जगातील सर्वात मोठी प्रेस आहे.
या विद्यापीठाने युकेला २८ प्रधानमंत्री दिले आहे. हे विद्यापीठ स्कॉलरशिप देखील देते यासाठी अनेक लोक अप्प्लाय करतात आणि काही लोकांची यामध्ये निवड करण्यात येते. इथे प्रवेश मिळविल्या नंतर प्रतिष्ठाला पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांनी व्हिडीओ कॉल करुन शुभेच्छा देखील दिल्या.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.