एखाद्या तरूण इंजिनियर अथवा डॉक्टरला विचारले कि तू ग्रामपंचायत निवडणूक लढवशील का ? तर उत्तर नाहीच येणार चला बघूया एका तरुणीची कथा..
थरुजन ग्रामपंचायत मागील वर्षी निवडणुकीत जबना चौहान यांनी निवडनुक मोठ्या उमेदीने लढवली वय होते फक्त २२ वर्ष….
तिला तिचे गाव आदर्श गाव बनवायचे होते याकरिता तिने हि निवडणूक लढवली. गरीब परिवारातील जबना चौहान हिने एका वर्षात दारूबंदीचा निर्णय घेऊन तिने हे दाखवून दिले कि तिचा निश्चय ठाम आहे.
या करिता अक्षय कुमार याने स्वतः जबना ची स्तुती केली व तिला पुरस्कारहि दिला.
जबना आपल्या राज्याकरिता नाहीतर संपूर्ण देशा करिता युवकांना आदर्श आहे. छोट्या गावात राहून मोठी स्वप्न पूर्ण केल्या जाऊ शकतात हे जबनाने दाखवून दिले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मंडी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव थरूजन आहे. या गावात आज सर्वत्र एकच नाव आहे जबना. कारण हि तसेच खास आहे कारण तिच्या राज्यात नाही तर संपूर्ण देशातील ती सर्वात युवा सरपंच आहे. कमी वयात मोठे स्वप्न बाळगणारी जबना चौहान हिचा भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोडी यांनी अंतरराष्ट्रीय महिला दिनी सन्मान केला.
तिला तिचे गाव आदर्श गाव बनवायचे होते याकरिता तिने हि निवडणूक लढवली. गरीब परिवारातील जबना चौहान हिने एका वर्षात दारूबंदीचा निर्णय घेऊन तिने हे दाखवून दिले कि तिचा निश्चय ठाम आहे. या जिल्ह्यात पहिला ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा निर्णय घेऊन जबनाने आदर्श निर्माण केला. आहे.
सुंदरनगर येथील सामाजिक जागरण मंच याने जबनाला दारूबंदी करिता राज्याची ब्रेंड एम्बेसेडर बनवायची मागणी केली होती. गुजरात येथील राष्ट्रीय सेमिनारमध्ये जबना हिने भाग घेतला होता. गावातील लोक म्हणतात जेव्हापासून जबना गावची सरपंच झाली तेव्हापासून गावात सकारात्मक बदल होत आहे. जबनाच्या मते देशातील बुद्धीजीवी लोकांनी प्रगती करिता समोर याला हवे तेव्हाच देशाची प्रगती शक्य आहे.
जबना चौहान यांनी संपूर्ण शिक्षण स्थानिक शाळेत व महाविद्यालयात पूर्ण केले. सुरवातीच्या काळात तिने न्यूज चैनल करिता एन्करचे काम केले. परंतु इथे तिचे मन रमत नव्हते तिला गावाची ओढ स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे ती गावाकडे परत आली आणि वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरूण सरपंच व्हायचा मान तिने मिळवला.
गावात तिने ग्रामसभेत ठराव घेऊन दारूबंदी केली आहे. ह्याकरिता तिला विरोधहि झाला परंतु ती डगमगली नाही. सोबतच तिने स्वच्छ भारत अभियानात संपूर्ण गाव स्वच्छ केलेले आहे.
थरजूण ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यात नावलौकिक होत आहे. हे सर्व काम तिने एक वर्षाच्या तिच्या कार्यकाळात केले. राज्याचे नाव तिने ह्या सर्व कार्यामुळे उंचावले आहे.
थरजूण ग्रामपंचायतला स्वच्छतेकरिता राज्यात पहिले स्थान मिळाले. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तिचा सत्कार केला आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह तिच्या कामाची नेहमी प्रशंसा करतात. यावर्षी आदर्श सरपंच म्हणून तिला सरकारने पुरस्कार दिला आहे.
जबना चौहानला खासरे तर्फे सलाम…
Very best post
I have noticed you don’t monetize your blog,
don’t waste your traffic, you can earn extra bucks every month because you’ve got high quality
content. If you want to know how to make extra money, search for:
best adsense alternative Wrastain’s tools