चित्रपट निर्माता करण जोहर हा बॉलिवूडच्या सर्वात चर्चित व्यक्तींपैकी एक आहे. गेल्या काही काळापासून तो सातत्याने बातम्यांमध्ये आहे. खरं तर, सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणानंतर त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी करण जोहरवर नातलगवाद आणि भेदभाव पसरवत असल्याचा आरोप केला आहे. परंतु त्याच्यावर असे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, या अगोदरही त्याच्यावर असे आरोप अनेकदा झाले आहेत. परंतु यावेळेस करण जोहर चांगलाच अडचणीत सापडला आहे.
करण जोहरबाबत दुसरी एक गोष्ट अनेकदा दबक्या आवाजात बोलली जाते, ती म्हणजे त्याचे खाजगी जीवन. त्याचे वागणे, बोलणे पाहून लोक वेगवेगळे अंदाज लावतात, पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या लव्ह लाईफ बद्दल सांगूनच टाकणार आहोत…
बॉलिवूडच्या कोणकोणत्या व्यक्तींसोबत जोडले जाते करण जोहरचे नाव ?
१) शाहरुख खान आणि करण जोहर: करण आणि शाहरुख या जोडीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोघांच्या या जवळीकीमुळे त्यांच्यामधील नात्याबाबत अनेकदा प्रश्न विचारले जातात. आजदेखील शाहरुख आणि करण यांच्याविषयीचे अनेक जोक्स, मिम्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. स्वतः शाहरुख “कॉफी विथ करण” शोमध्ये याबद्दल बोलला होता. पण करण जोहरने त्याच्या “An Unsuitable Man” या आत्मचरित्रात शाहरुख आपला चांगला मित्र असून आपण त्याला वडिलांसमान मानतो असे लिहले आहे.
२) सिद्धार्थ मल्होत्रा आणि करण जोहर : करण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्यावरही लोकांनी प्रश्नचिन्ह उभी केली आहेत. ’माय नेम इज खान’ चित्रपटाच्या वेळी सिद्धार्थ करणला सहाय्य करत होता तेव्हापासून ते दोघे चांगले मित्र आहेत. त्या दोघांमधील मैत्री इतकी घट्ट झाली की दोघेजण एकदा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला गेले. त्यानंतर करणने सिद्धार्थला “स्टुडंट ऑफ द इयर” चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची संधी दिली. असं म्हणतात की करण जोहरला सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व खूपच आवडतं त्यामुळे तो त्याच्या प्रेमात पडला.
३) मनीष मल्होत्रा आणि करण जोहर : फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि करण जोहर यांच्या नात्याबद्दलही चर्चा झाली होती. दोघांची बॉन्डिंग इतकी घट्ट आहे की त्यांना बॉलिवूडमधील सर्वात नेत्रदीपक जोडी मानले जाते. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखतात आणि अनेक पार्ट्यांमध्ये दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांच्यात लफडं सुरु असल्याच्या चर्चा अधूनमधून कानावर येतात. परंतु दोघांनी कधी त्यांच्या नात्याविषयी कबुली दिली नाही.
४) ट्विंकल खन्ना आणि करण जोहर : करण जोहरचे पहिले प्रेम दुसरे तिसरे कुणी नसून ट्विंकल खन्ना होती. दोघे एकाच शाळेत शिकले. शिकत असतानाच करण ट्विंकलवर फिदा झाला. परंतु मध्येच अक्षय कुमारची एंट्री झाली आणि दोघांचे नाते सुरु होण्याआधीच संपले.
५) एकता कपूर आणि करण जोहर : एकता कपूरचे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण २००० साली एकता आणि करणच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही माध्यमात आल्या होत्या. गेल्या, परंतु त्या अफवा असल्याचे सांगण्यात आले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.