सध्याच्या काळात कुठल्याही मुलीचे सौंदर्य तिचे दिसणे, शरीराचा बांधा आणि चेहऱ्यावर अवलंबून असते. तसं पाहायला गेलं तर एक महान फार प्रसिद्ध आहे, “सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते..” परंतु वेगवेगळ्या ठिकाणी सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १९ व्या शतकात जाड असण्यालाच सौंदर्य मानले जायचे. त्याच काळातील एका राजकुमारीचे किस्से आजदेखील सांगितले जातात.
कोण होती ती राजकुमारी ?
सध्या सोशल मीडियावर या राजकुमारीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोला देण्यात आलेले कॅप्शन आहे, “राजकुमारी कजर. पर्शियामधील सौंदर्याचे प्रतीक. या राजकुमारीने लग्नाला नकार दिल्याने १३ मुलांनी स्वतःचा जीव दिला.” तर आपल्या माहितीसाठी सांगतो, या राजकुमारीचे नाव होते अल कजर सुलताना. ती इराणची राजकुमारी होती. या राजकुमारीने सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली. तिच्या चेहऱ्यावर चक्क मिशा होत्या आणि ती खूप जाडही होती. परंतु तरीदेखील तिला सुंदर मानले जायचे.
त्या काळातील बहुतांश तरुण राजकुमारीच्या सौंदर्यावर फिदा होते आणि तिच्याशी लग्न करावे असे त्यांना मनोमन वाटत होते. अनेकांनी तिला मागणीही घातली. परंतु राजकुमारी कजरने सर्वांची मागणी धुडकावून लावली. राजकुमारीच्या या नकारानंतर व्यथित होऊन १३ तरुण पोरांनी आपला जीव दिल्याचे देखील सांगितले जाते.
वास्तविक पाहता राजकुमारीने त्या तरुणांना नकार देण्यामागची कारण एकच होते, ते म्हणजे तिचे लग्न अगोदरच अमीर हुसेन खान शोजा ए सल्तनेह याच्याशी झाले होते. त्याच्यापासून राजकुमारीला दोन मुले आणि दोन मुलीही झाल्या होत्या. नंतर दोघांचा घटस्फोट झाला.
असेही सांगितले जाते की त्या राजकुमारीची अनेक लफडी होती. त्यापैकी दोन प्रमुख नवे म्हणजे गुलाम अली खान अजीजी अल सुलतान आणि इराणी कवी आरिफ काझविनी. राजकुमारी त्या काळातील आधुनिक विचारसरणीच्या स्त्रियांपैकी एक होती. असेही सांगितले जाते की ती पाश्चात्य संस्कृतीने खूपच प्रभावित झाली होती. त्यामुळेच ती नेहमी पाश्चात्य कपडे परिधान करायची. राजकुमारी कजर ही त्या काळातील बुरखा उतरवणारी पहिली महिला मानली जाते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.