झोपायला गेल्यावर झोप न येणे हे आजकल स्त्री आणि पुरुषांकरिता सारखी समस्या आहे. झोप न येण्याकरिता अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये शारीरक व मानसिक विकार, अनियमित झोपायची वेळ इत्यादी गोष्टी यास कारणीभूत असतात. खालील उपाय वापरून तुम्ही चांगली शांत झोप घेऊ शकता.
जर तुम्हाला एखादी गोष्ट त्रास देत असेल तर त्यामुळे झोप न येणे साहजिकच आहे. त्यामुळे ह्या ताणातून मुक्त व्हा जर तुम्हाला औषोधपचार सुरु असेल तर झोपण्या २ तास अगोदर औषध घ्या. आणि झोपताना कैफीन असलेले पेय घेऊ नये.
कोमट पाण्याने आंघोळ
जर तुम्हाला झोप येत नाही किंवा झोपल्यावर जाग येत असेल तर तुम्ही झोपण्या अगोदर कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. यामुळे तुमच्या मासपेश्यांना आराम मिळतो व शरीर तणावापासून दूर राहते.
योगामुळे शरीर आणि मन स्वस्थ राहते. रक्तसंचार योग्य बनून राहतो. आणि मानसिक तणाव व चिंतामुक्त मनुष्य राहतो. त्यामुळे योगासन हे एक प्रभावी माध्यम आहे.
जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला अधिक वाढलेले वजन कमी करावे लागेल. वाढलेल्या चरबीमुळे श्वास घेणे अवघड होते. वजन कमी केल्याने श्वासप्रक्रिया योग्य राहते
आणि शांत झोप येईल.
झोपायचे तास निश्चित करा आणि त्या दरम्यान झोपायचे हे नक्की मनाशी ठरवा. आठ तासाची शांत झोप घेणे शरीरास आवश्यक आहे.
तंबाकूजन्य पदार्थ उत्तेजन देतात त्यामुळे हे टाळावे. तुम्हाला धुम्रपानाची सवय असेल तर सायंकाळी धुम्रपान करणे टाळा.
आरामदायक शांत संगीत हे झोपण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रात्री तुम्ही हे संगीत लावून झोपायला मदत घेऊ शकता. मधुर संगीत झोपायला मदत करतात.
अंधारात झोपायचे प्रखर उजेडात मेंदू त्यांचे स्त्राव अधिक प्रमाणत शरीरात स्त्राव करतो. त्यामुळे अंधारात झोपणे शांत झोपण्याकरिता आवश्यक आहे.
खोलीतील तापमान ७० फैरनाईट च्या वर असेल तर झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे खोलीचे तापमान ६० ते ७० फैरनाईटच्या मध्ये रहावे.
झोपण्याच्या २ तास अगोदर पाणी पिऊ नका. त्यामुळे रात्री अपरात्री बाथरूमला जायचे काम पडणार नाही व शांत झोप येणार.
झोपण्या अगोदर गोड पदार्थ खाऊ नका. त्यामुळे शरीरास उत्तेजनामिळून झोपण्यामध्ये अडथळे निर्माण होतात.
Thnxxxx