बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्म ह त्येनंतर अनेक वादग्रस्त गोष्टी बाहेर यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही कलाकारांनी बॉलिवूडचे अनेक कारनामे उघड केले आहेत जे खूपच धक्कादायक आहेत. यामध्ये सर्वात पुढे आहे अभिनेत्री कंगना राणावत. तिने सुशांतच्या मृ त्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
यावेळेस कंगना ने निशाणा साधला आहे बॉलिवूडचे एक मोठे निर्माते आणि डायरेक्टर महेश भट्ट यांच्यावर. कंगना राणावत ने महेश भट्ट यांनी तिला गँ गस्टर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. त्यासाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत. पण याचा अर्थ आसा नाही कि त्यांनी मला पागल म्हणावं आणि चपलेने मा रावं. माझ्यावर महेश भट्ट यांनी चप्पल फेकून मा रली होती. असे आरोप कंगनाने केले आहेत.
काय झालं त्या दिवशी?
या घटनेची आठवण सांगताना कंगनाने म्हंटले कि महेश भट्ट यांनी त्यांच्या एडिटिंग स्टुडिओ मध्ये कॉल करून बोलावले होते. धोका हा चित्रपट महेश भट्ट यांनी कंगनाला ऑफर केला होता. या चित्रपटाची स्टोरी कंगनाला आवडला नाही. त्यामुळे तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर महेश भट्ट खूपच नाराज झाले होते.
कंगनावर महेश भट्ट यांनी ओरडण्यास सुरुवात केली. तिला मा रायला देखील ते पुढे आल्याचे तिने सांगितले. त्यानंतर महेश यांची मुलगी पूजा भट्टने त्यांना थांबवलं आणि असे करू नका सांगितले. कंगनाने सांगितले कि ती त्या दिवशी महेश भट्ट यांचा मार खाता खाता राहिली.
कंगनाने जो चित्रपट नाकारला होता त्या चित्रपटात एक मुलगी पोलिसांच्या अत्या चाराला कंटाळून आ त्मघाती ह ल्लेखोर बनते. कंगनाची वय त्यावेळेस १८ वर्षच होते, पण ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत होती. तिला हि स्टोरी आवडली नाही आणि तिने चित्रपट नाकारला.
चप्पल फेकण्याचा किस्सा काय होता-
कंगनाने चप्पल फेकण्याचा किस्सा पण सांगितला आहे. लम्हे चित्रपटाच्या ट्रायलच्या वेळेसची हि घटना आहे. थिएटरच्या मेन गेटवर महेश भट्ट आले होते आणि त्यांनी कंगनाला बाहेर पाठवले होते. ते तिला ओरडत होते पण कंगनाला तिचा चित्रपट बघायचा होता. त्यावेळी त्यांनी मला पाहिले आणि आपली चप्पल फेकून मा रली. पण लोकांनी त्यांना पकडून मध्ये नेले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.