सोशल मिडीयावर कधी काय वायरल होणार हे सांगता येत नाही. आसामच्या महापुरातील काही फोटो सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे आणि यामध्येच एक फोटो सोशल मिडीयावर आलेला आहे ज्यामध्ये लोक त्या लहान मुलाला खरा बाहुबली म्हणून त्याची प्रशंसा करत आहे.
परंतु या फोटोमागची कहाणी काही वेगळीच आहे असे आमच्या लक्षात आले आहे, हा फोटो अनेक सोशल मिडिया पेजवर शेअर करण्यात आलेला आहे व त्यामध्ये लिहण्यात आले आहे कि, स्वतःचा जीव धोक्यात घालून हरिणाच्या पिलाला वाचविणारा खरा बाहुबली, परंतु हा मुलगा कोण आणि हा प्रसंग कुठे घडला याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे.
बाहुबली सिनेमात छोट्या बाहुबलीला वाचविण्यासाठी शिवगामी देवी आपला जीव धोक्यात घालते त्या सिनेमातील सीनची येथे तुलना केल्या जात आहे. twitter वर तर एका खात्यावर या फोटोला ७००० पेक्षाही जास्त वेळेस retweet केले आहे आणि ३० हजार लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.
परंतु गुगल वर रिवर्स फोटो इंजिनवर हा फोटो सर्च केल्या नंतर वेगळीच माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रसंग ६ फेब्रुवरी २०१४ ला घडलेला आहे. बांगलादेश मध्ये हा प्रसंग घडला होता नोआखली इथला बिलाल नावाचा मुलाने या हरिणाच्या पिलाचे जीव वाचविला आहे.
२०१४ साली बांगलादेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाउस आला आणि हिमालयातून येणारे पाणी या दोन्हीमुळे महापूर आला होता. हा फोटो वन्यजीव फोटोग्राफर ह्सिबुल वहाब याने काढला आहे. मुलाची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे, परंतु आपण जो फोटो शेअर करतो त्या अगोदर त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमच्या पेजला लाईक करायला विसरू नका.