बॉलिवूडची २०२० हे वर्ष अत्यंत दुःखद राहिले आहे. अशातच अजून एका प्रतिभावान मॉडेलने जगाचा निरोप घेतला आहे. फोटोत दिसणारा हा मॉडेल बघून तुम्ही रणवीर कपूर म्हणून चुकला असाल. पण हा रणवीर कपूर नसून हेबेहूब रणवीर कपूरसारखा दिसणारा काश्मीरचा सुप्रसिद्ध मॉडेल जुनैद शाह आहे. जुनैद शाहचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
तो हुबेहूब रणवीर कपूरसारखा दिसायचा म्हणून तो नेहमी चर्चेत असायचा. श्रीनगर येथील घरात त्याचा मृत्यू झाला आहे. काश्मीरी पत्रकार यूसुफ जमील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. युसुफ हे जुनैदच्या घराजवळ राहत होते.
मागील काही काळात त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याला लाखो लोक इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. रणवीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी जुनैद आणि रणवीर कपूरचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी त्याचे त्यावेळी कौतुक केले होते. २०१५ मध्ये ऋषी कपूर यांनी जुनैदचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.
OMG. My own son has a double!!! Promise cannot make out. A good double pic.twitter.com/iqF7uNyyIi
— Rishi Kapoor (@chintskap) April 16, 2015
ऋषी कपूर यांनी ट्विटरवर दोघांचे फोटो टाकत म्हंटले होते,’ हे देवा माझ्या मुलाचा हुबेहूब कॉपी बघून विश्वास बसत नाहीये.’ मीडिया रिपोर्टनुसार २००७ मध्ये रणवीर कपूरने जेव्हा सावरिया मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती तेव्हा जुनैद कॉलेजमध्ये होता. हा सिनेमा बघून लोकांनी त्याला रणवीर कपूर म्हणायला सुरुवात केली.
जुनैद शाहने काश्मीर युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले होते. त्यानंतर त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पत्रकार युसूफ जुनैद यांनी ट्विटरवर पोस्ट करून म्हंटल आहे,’रात्री उशिरा आमचे शेजारी निसार अहमद यांचा मुलगा जुनैद शाहचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. लोक त्याला बॉलिवूडच्या रणवीर कपूरची कॉपी समजायचे.’
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.