बॉलिवूडचा महानायक म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चनला कोरोनाचे संक्रमण झाले असून त्याला मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. स्वतः अमिताभ बच्चनने देखील ट्विटरवर ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर संपूर्ण देशभरातील बच्चनचे चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही बच्चनच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याच्यावर योग्यरीत्या उपचार सुरु असल्याचे सांगितले आहे. आज आपण अमिताभ बच्चननवे उत्तरप्रदेशच्या एका मुख्यमंत्र्यांचे राजकारण कसे संपवले होते ते जाणून घेणार आहोत.
कोण होते ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री ?
अमिताभ बच्चनने उत्तरप्रदेशच्या ज्या मुख्यमंत्र्यांचे राजकारण संपुष्टात आणले त्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे हेमवती नंदन बहुगुणा ! महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले बहुगुणा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये उत्तरप्रदेशच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत निवडून गेले होते. त्यांच्या सभागृहातील अभ्यासू कामकाजामुळे ते काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जायचे. १९७३ ते १९७५ त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यानंतर आपल्या अखेरच्या काळात त्यांनी कॉंग्रेसला संपवण्याची शपथच घेतली होती.
सुरुवातीला जनता पक्ष, नंतर समाजवादी जनता पक्ष आणि शेवटी स्वतःचा लोकशाही समाजवादी पक्ष स्थापन करुन आपले राजकारण जिवंत ठेवले. त्यांनी आपला मुलगा विजय बहुगुणा यांना काँग्रेस विरोधात मैदानात उतरवले होते, जे उत्तराखंड राज्य स्थापनेनंतर त्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या कन्या रिटा बहुगुणा या देखील २०१६ साली भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. कधीकाळी उत्तरप्रदेश काँग्रेसचे चाणक्य असणारे हेमवती बहुगुणा काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी पेटून उठले होते पण अमिताभ बच्चनने त्यांचे राजकीय करिअरचं संपवून टाकले.
अमिताभ बच्चनने कसे संपवले उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे राजकारण ?
१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या ह त्येनंतर देशात निवडणुकांची घोषणा झाली. काँग्रेसचे नेतृत्व राजीव गांधींकडे होते. अलाहाबाद मधून हेमवती नंदन बहुगुणा यांच्याविरोधात कुणाला उभे करायचे हा काँग्रेससमोर प्रश्न होता. निवडणूक अर्ज भरायच्या आदल्या दिवशी राजीव गांधींनी आपला लहानपणापासूनचा मित्र बॉलिवूडमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या अमिताभ बच्चनचे नाव जाहीर केले.
अमिताभला उमेदवारी दिल्यानंतर बहुगुणांनी “दम नहीं है पंजे में लंबू फंसा शिकंजे में, सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना” असे डायलॉग मारत प्रचार केला तर अमिताभच्या बाजूने इंदिराजींबद्दलची सहानुभूतीची लाट, त्याची लोकप्रियता आणि ज्या बच्चनचा दमदार प्रचार या जमेच्या बाजू होत्या.
जया बच्चन यांनी “मी उत्तरप्रदेशची सून आहे, मला सुनमुखाचा आशीर्वाद म्हणून अमिताभला मते द्या” असे आवाहन केले. निवडणूक झाली. बच्चनने बहुगुणांना १ लाख ८७ हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले. या पराभवानंतर बहुगुणांनी राजकारणातून संन्यास घेतला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.