चीन आणि भारताचे संबंध महिला काही महिन्यापासून बिघडले आहेत. भारताचे चीनसोबतच अनेक शेजारील देशांसोबत काही महिन्यांमध्ये खटके उडाले आहेत. यामध्ये नेपाळने चीनची बाजू घेत भारतासोबत वादाला सुरुवात केली होती. नेपाळचे पंतप्रधान अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या गोष्टीवरून भारताविरुद्ध बरळत आहेत.
पण चीनची बाजू घेणाऱ्या नेपाळला चीनने चांगलाच चुना लावला आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी चीनसोबत घनिष्ठ संबंध बनवले आहेत. पण आता केपी शर्मा ओली चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात देशभरात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.
याला कारण ठरलं आहे चीनसोबत नेपाळने केलेला विमान खरेदीचा करार. ६ वर्षांपूर्वी नेपाळ सरकारने चीनसोबत केलेल्या ६ विमानांच्या करारावरून हा वाद सुरू झाला आहे.
चीनने विमान विक्रीतून लावला नेपाळला चुना-
चीनकडून नेपाळने ६ वर्षांपूर्वी विमान खरेदी केले होते. द काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, चीनने २०१४ मध्ये हि विमाने उच्च दराने नेपाळला विक्री केली. पण हि विमाने निकृष्ट दर्जाची होती. हि विमाने चीनने अगोदर बांगलादेशला विकली होती. पण निकृष्ट असल्याने बांगलादेशने ती नाकारली. चीनने हीच विमाने नंतर नेपाळला विकून चुना लावला आहे.
या विमानखरेदी मुले नेपाळी लोक तिथल्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारत आहेत. या ६ विमानांची वाहतूक चीन ऐरलाईन्सने थांबवली आहे. २०११ मध्ये बांगलादेश आणि नेपाळची टीम चीनच्या विमानाच्या तपासणीसाठी गेले असता बांगलादेश हे विमान नाकारले होते.
गिफ्टच्या नावाने चीनने लावला चुना-
नेपाळला हे विमाने गिफ्ट म्हणून चीनकडून हवे होते. पण चीनने काही विमाने अगोदर खरेदी करण्याची अट घातली. त्यानंतर नेपाळ खरेदीला तयार झाला नि त्यांनी चीनकडून २ MA60 आणि ४ Y12e विमान खरेदी केले. तर हेच १-१ विमान चीनने गिफ्ट म्हणून दिलं. या विमानांची किंमत जवळपास ३०० कोटी होती. पण आता ६ वर्षातच हे विमान वापरण्याच्या लायकीचे राहिले नाहीयेत. नेपाळने चीन बँकेकडूनच कर्ज काढून हे विमान घेतले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.