राजस्थानच्या राजकीय नाट्यामध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोतांचा करिष्मा चालताना दिसत आहे. एका बाजूला सचिन पायलट आपल्याकडे ३० आमदारांचा गट असल्याचा दावा करत होते, तर दुसऱ्या बाजूला अशोक गेहलोतांनी मुख्यमंत्री निवासस्थानी माध्यमांसमोर शक्तिप्रदर्शन करुन दाखवून दिले की त्यांच्या सरकारकडे बहुमत आहे. परंतु तरीही चित्र अद्याप स्पष्ट नाही. पण या राजकीय खेळामध्ये अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे.
अशोक गहलोत करायचे जादूचे खेळ
अशोक गहलोत यांचे वडील बाबू लक्ष्मणसिंग गेहलोत हे देशातील एक प्रसिद्ध जादूगार होते. अशोक लहान असताना त्यांनीही हे जादूचे प्रयोग शिकले आणि आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत केली. अशोक ज्यावेळी कॉलेजात जायला लागले, तेव्हा विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पाऊल टाकले.
गांधी कुटुंबाशी जवळीक
१९७१ पश्चिम बंगाल येथे बांग्लादेशातुन आलेल्या प्रवाशांसाठी बनवण्यात आलेल्या रि फ्युजी कॅम्पमध्ये काम करताना पहिल्यांदा अशोक गेहलोतांवर इंदिरा गांधींची नजर गेली. त्यांचे कौशल्य पाहून इंदिरा गांधींनी त्यांना राजकारणात आणले. हळूहळू ते गांधींच्या कुटुंबाच्या इतक्या जवळ आले की वयाच्या ३१ व्या वर्षी १९८० मध्ये ते इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये मंत्री बनले होते. राजस्थान NSUI चे अध्यक्ष, राजस्थान काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी, इंदिरा गांधींच्या ह त्ये नंतर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री अशी पदे त्यांनी भूषवली.
एका हवालदाराच्या मदतीने गेहलोतांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा का र्यक्रम केला
१९८५ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला आणि हरिदेव जोशी मुख्यमंत्री बनले. डिसेंबर १९८८ मध्ये राजस्थानात दुष्काळ पडला होता. राजीव गांधींनी राजस्थानातील सरिस्का येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक आयोजित केली. परंतु त्यांनी स्पष्ट सूचना केल्या की या बैठकीला कोणीही सरकारी कर्मचारी हजर असणार नाहीत. मुख्यमंत्री जोशींना देखील याची कल्पना देण्यात आली.
राजीव गांधींची गाडी ज्यावेळेस मिटींगच्या ठिकाणी आली, पण तिथे उभे असणाऱ्या एका हवालदाराने त्यांना डावीकडे वळायला सांगितले. जसे राजीव गांधी डावीकडे वळले, तसे समोरचे चित्र पाहून ते चिडले. समोर मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा उभा होता. अधिकाऱ्यांची गर्दी होती. राजीव गांधी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारले, की या गाड्या कुठून आल्या, कधी आल्या आणि किती लांबून आल्या ? त्यांना हा तामझाम आवडला नाही.
त्यांनी सर्वांसमोर मुख्यमंत्री जोशींना फ टकारले. या घटनेच्या महिन्यानंतर जोशींना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. असे सांगितले जाते की त्या हवालदाराला स्वतः अशोक गेहलोतांनीच तिथे उभे केले होते आणि राजीव गांधींची गाडी येताच डावीकडे वळण्याचे निर्देश करण्यास सांगितले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.