अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सुष्मिताने बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. सध्या सुष्मिता सेन चर्चेत आली आहे तिची वहिनी चारू असोपा मुळे. सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन मागील वर्षी अभिनेत्री चारू असोपा सोबत विवाहबंधनात अडकला होता. मागील वर्षी ७ जूनला दोघांचं लग्न झालं होतं.
दोघांची एका मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले आणि त्यांनी गोव्यात कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले होते. या दोघांचे आजपर्यंत अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
चारूचे सध्या साडीवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने साडीमधील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले. या फोटोंमध्ये चारू असोपा पारंपारिक लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
बघा चारुचे साडीतील खास फोटो-
१ वर्षातच राजीव सोबत नात्यात आला दुरावा?
दरम्यान राजीव आणि चारुच्या लग्नाला एकच वर्ष पूर्ण झालं असून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत. याला सोशल मीडियातून चारूने दुजोरा देखील दिला आहे. चारूने तिच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. या दोघांनी इन्स्टाग्रामवरचे देखील एकमेकांसोबतचे फोटो डिलीट केले आहेत.
सध्या राजीव सेन आपल्या कामाच्या निमित्ताने दिल्लीत राहतो तर आणि चारू असोपा मुंबईत राहते. चारू अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अशा गोष्टी पोस्ट करत आहे ज्यातून तिच्या चाहत्यांची चिंता वाढत आहे. एका मुलाखतीत तिने राजीव जीवनात खूप पुढे गेल्याचे बोलले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.