सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला एक महिना पूर्ण होत आहे. संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीत सुशांत सिंग राजपूत यांच्या करिता त्याचे चाहते पोस्ट करत नाही असा दिवस नाही आहे. यामध्ये सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिताने इंस्ताग्रामला एक पोस्ट केली आहे ज्यावर अनेक लोक तिला मजबूत राह असे सांगत आहे.
अंकिता नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते ती काहीना काही पोस्ट शेअर करत असे. परंतु सुशांतच्या मृत्यूनंतर तिला एक झटका लागला आहे ती एक महिन्यापासून सोशल मीडियापासून दूर होती. अंकिताने या अगोदरची पोस्ट सुशांतच्या मृत्युच्या एक दिवस आधी केली होती, यामध्ये तिने आपला एक tiktok व्हिडीओ अपलोड केला होता.
सुशांतच्या मृत्युनंतर ती सुशांतच्या घरी देखील गेली होती. पटना येथे जाऊन तिने सुशांतच्या घरच्यांची भेट घेतली होती. पवित्र रिश्ता या मालिके पासून सुरु झालेली त्यांची प्रेम कथा खूप चर्चेत होती. २०१६ मध्ये ते लग्न करणार होते अश्या अनेक गोष्टी न्यूजवर आल्या होत्या परंतु दोघांचे संबंध खराब झाले आणि दोघे वेगवेगळे झाले.
अंकिताने घरातल्या मंदिरात एक दिवा लावला आहे आणि त्या भोवताल काही फुले ठेवलेली आहे असा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत अंकिताने फक्त ३ शब्द लिहले आहे आणि हे तीन शब्द तिचे दुखः आपल्या पर्यंत पोहचवणार हे नक्की तिने लिहलेले आहे. चाईल्ड ऑफ गॉड
अंकिताच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया
अंकिताचे चाहते तिला या पोस्ट नंतर हिम्मत ठेव अश्या प्रतिक्रिया देत आहे. तसेच तिला लोक समजवत आहे कि तुझे दुखः आम्ही समजू शकतो आणि तुझ्या करिता आम्ही प्रार्थना करत आहो. काही जणांनी लिहल आहे कि, पाहिलं प्रेम हे पाहिलं प्रेमच असते, सुशांतला ती विसरू शकणार नाही.
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील आपला whatsapp डीपी बदलला आहे तिने त्यांच्या दोघाचा फोटो whatsapp वर ठेवलेला आहे ज्यामध्ये दोघे खूप खुश दिसत आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.