राजकारण हा आपल्या देशात पिढ्यानपिढ्या मोठा आवडीचा विषय आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वाना राजकारणात खूप रस असतो. प्रत्येक पक्षात कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याकडे असते. भलेही राजकारणातून काही फायदा होऊ नाही होऊ पण कार्यकर्ते हे आपल्या नेत्यांना देवच मानतात. भारतात याचं प्रमाण खूप जात आहे.
भारतात जसे नेते आहेत तसेच युवा नेत्याचे फॅड देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. गल्लीगल्लीत आपल्याला युवा नेते बघायला मिळतील. हे युवा नेते बनणं खूपच सोपं आहे. यावरच एका लेखकाने खूप मजेशीर लेख लिहिला आहे. विशेष म्हणजे हे लेखक देखील भावी आमदार असून त्यांना आपल्या कर्तृत्वावर राजकारणात यश मिळवायचं आहे. तर जाणून घेऊया काय आहेत युवा नेता होण्याचे रहस्य..
युवा नेता होण्यासाठी लागणारं साहित्य अन पात्रता
1- डुप्लिकेट कोल्हापुरी चप्पल
2- दोनशे रु.चा व्हाईट लिनन शर्ट अन पॅन्ट (शर्टच्या खिशात बाहेरून दिसेल अशी शंभरची एक नोट असावी व आतून दहा-दहा च्या नोटा असाव्यात, पॅन्ट शक्यतो जास्त पातळ नसावी आतली लाल अंडरवियर दिसू शकते)
3- खिशात अन तोंडात मावा
4- एखादा ब्रँडेड दिसणारा पण नसणारा पेन
5- दोन फेसबुक खाते अन जरासा मोठा मोबाईल (शक्यतो हातात ठेवावा)
6- नेत्यांसोबत चार-दोन फोटो, सेल्फी असल्यास उत्तम
7- कोपच्यात आलेल्या चार-दोन बातम्या आणि एखादं बॅनर (नंतर ते सोयाबीनचं बुचाड किंवा कडब्याची गंज झाकायला कामी येतंच म्हणा)
8- पेट्रोल तळाला गेलेली एखादी बाईक (त्यावर साहेबांचा फोटो)
9- उधारी असलेलं चहाचं हॉटेल, पान टपरी ( उधारी वाढल्यास वेळीच टपरी बदलायला हवी अन्यथा अब्रूचं खोब्र व्हायला वेळ लागत नाही )
10- सत्तर रुपयाचा लिंबा खालचा गॉगल ( कलर शक्यतो काळा असावा )
पात्रता एकच आहे: तो प्रचंड बेरोजगार असावा अन घरात इज्जत नसावी.. झाला लगी; आमचं काळीज, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, मार्गदर्शक, भावी सरपंच, साहेबांचा विश्वासू, साहेबांचा डावा (उजवा) हात, उमलतं नेतृत्व, आधारस्तंभ ….!! वगैरे वगैरे .
– आपलाच भावी आमदार श्री.चांगदेव (आबा) गिते 9665875815