सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला १ महिना पूर्ण होत आहे परंतु सोशल मिडीयावर त्याचे चाहते आणखी देखील या धक्क्यातून निघालेले नाही आहे. आज एक महिना झाला तरी सोशल मिडिया त्याच्या आठवणीत येणाऱ्या पोस्टनि भरून दिसतो. तो नेहमी स्मरणात रहावा या करिता आता चक्क रस्त्याला सुशांत सिंग राजपूत याचे नाव देण्यात आले आहे.
सुशांत सिंग हा बिहारचा आहे आणि त्याचे मूळ गाव मलहिडा हे आहे. तो नेहमी स्मरणात रहावा त्याकरिता तिथल्या महानगर पालिकेने निर्णय घेतला आहे कि सुशांत सिंगच्या नावावर रस्त्याला नाव देण्यात यावे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमी नुसार महापौर सविता देवी यांनी सांगितले कि “सुशांत एक महान कलाकार होता.मधुबनी पासून पूर्णिया माता चौका पर्यंत जाणाऱ्या रस्त्याला सुशांत सिंग राजपूत रस्ता आणि फोर्ड कंपनी येथील गोल चौकास सुशांत सिंग राजपूत चौक असे नामकरण करण्यात येणार आहे.
या बातमी नंतर त्यांच्या गावातील लोकात आनंदाचे वातावरण आहे. नुकताच सुशांत सिंग राजपूत याची बहिण कीर्ती सिंग हिने सुशांतच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग एकत्र करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अतिशय भावूक अश्या व्हिडीओ मध्ये सुशांत आपल्या कुत्र्यासोबत खेळताना, अभ्यास करताना, डान्स करताना, टेनिस खेळताना दिसत आहे.
भाजपा खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तथ्याचा तपास करण्या करिता एक वकील नियुक्त केला होता. तथ्य आढळल्यास हि केस सीबीआय कडे सोपविल्या जाऊ शकते. या बाबत स्वामी यांनी twitter वर सांगितले आहे कि ” मी ईशकरन व सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू बाबत तपास करायला सांगितला आहे कि त्यामुळे हि केस सीबीआय चौकशी करिता ठीक आहे कि नाही हे कळेल.”
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.