अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला कौन बनेगा करोडपती शो आजपर्यंत अनेकांचे आयुष्य बदलून गेला आहे. या शो मधून पैश्यांसोबत ओळख प्रसिद्धी मिळायची. शोच्या सेटवरून आजपर्यंत अनेक खास गोष्टी प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत. अशीच एक गोष्ट आपण आज खासरेवर जाणून घेऊया जी या सेटशी निगडित आहे आणि खूप प्रेरणादायी देखील आहे.
२००१ मध्ये केबीसीचं एक विशेष पर्व आलं होतं. ते पर्व होतं केबीसी ज्युनिअर. या केबीसी जुनिअरमध्ये त्यावेळी १४ वर्षाच्या रवी मोहन सैनीने १५ प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर देऊन १ करोड रुपयांचे बक्षीस जिंकले होते. या गोष्टीला आता जवळपास आता २० वर्ष पूर्ण होत आलेत. हा केबीसी चा विजेता ठरलेला चिमुरडा आता काय करतो माहिती आहे का?
रवी सैनी आता डॉ रवी सैनी बनले आहे. एवढेच नाही तर रवी सैनी आता आयपीएस देखील बनले आहेत. डॉ रवी मोहन सैनी आता ३३ वर्षाचे झाले आहेत. त्यांनी गुजरातच्या पोरबंदर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. या अगोदर त्यांनी राजकोटमध्ये डीसीपी म्हणून देखील काम केले आहे.
MBBS करून डॉक्टर बनले रवी-
रवी सैनी यांनी अगोदर MBBS चे शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी मेडिकल कॉलेज जयपुर येथून त्यांनी आपले MBBS चे शिक्षण पूर्ण केले. MBBS ची इंटर्नशिप सुरु असतानाच रवीची निवड प्रशासकीय सेवेत झाली. रवीचे वडील हे नेव्ही मध्ये होते. त्यामुळे त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन रवीने आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. रवी यांची निवड २०१४ मध्ये भारतीय पोलीस सेवेत झाली. त्यांनी भारतात ४१६ वि रँक मिळवत यश संपादन केले होते.
रवीने २०१२ आणि २०१३ मध्ये UPSC ची परीक्षा दिली पण त्याला हवे तसे यश २०१४ मध्ये मिळाले. त्याची आयपीएस म्हणून निवड झाली. रवि गुजरात मध्ये ड्युटीला असून रवी यांचे मूळ गाव अलवर राजस्थान आहे.
केबीसीच्या वेळी १० विचे सुरु होते शिक्षण-
रवी यांनी जेव्हा केबीसी मध्ये भाग घेतला होता तेव्हा ते फक्त दहावीत होते. रवीने २००१ साली १ करोड रुपये जिंकले होते त्यातले त्यांना ६९ लाख रुपये भेटले होते. नियमाप्रमाणे हे पैसे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मिळायचे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.