गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात त णावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर देशभरातून चीनविरोधी संतापाची लाट उसळली. देशाच्या एकता, अखंडता आणि संरक्षण यंत्रणेसमोर संकट उभा झाल्याने २९ जून २०२० रोजी भारत सरकारने ५९ चायनीज मोबाईल ऍप्लिकेशन्सवर भारतात बंदी घातली.
त्यामध्ये टिकटॉक, हेलो, वुईचॅट, युसी ब्राऊजर, शेअर इट, क्लब फॅक्टरी, कॅम स्कॅनर, इत्यादि ऍप्लिकेशन्सचा समावेश होता. भारत सरकारच्या या निर्णयामुळे या सर्व ५९ कंपन्यांना नुकसान होणार आहे, त्यातल्या त्यात टिकटॉकला सर्वाधिक नुकसान होणार आहे.
टिकटॉक भारतात किती कमाई करत होते आणि त्यांना किती नुकसान झाले ?
तसं पाहायला गेलं तर टिकटॉक भारतामध्ये जास्त कमाई करत नव्हते. परंतु भारत हा त्या देशांपैकी एक देश होता, ज्या देशामध्ये टिकटॉक सर्वाधिक प्रमाणात डाउनलोड करण्यात आले होते. याचा विचार करूनच टिकटॉकचे संचालन करणाऱ्या बाइटडांस कंपनीने भारतात सर्वाधिक गुंतवणूक केली होती. चीन सरकारच्या ग्लोबल टाइम्स वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार भारत सरकारच्या या एका निर्णयामुळे एकट्या बाइटडांस कंपनीला ४५००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भारताने ५९ चायनीज ऍप्स बॅन केल्याने चीनचे काय नुकसान झाले ?
चीनने २०३० पर्यंत जगातील सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत असे आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तयार करण्याचे ध्येय ठेवले होते. भारतात वापरल्या जात असणाऱ्या चायनीज ऍप्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच चीनचे सर्वात प्रगत तंत्रज्ञान तयार करण्याचे काम सुरु होते.
भारतातून गोळा केल्या जात असणाऱ्या माहितीचा प्रवाहच खंडित केला, तर चीनच्या आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या कामावर वाईट परिणाम होईल. या प्रोजेक्टच्या साहाय्याने चीन करोडो रुपये कमावण्याचे स्वप्न बाळगून बसला आहे, भारताच्या या निर्णयाने चीनच्या या बिगबजेट प्रोजेक्टची हवाच काढून घेतली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.