राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो शाही थाट. पण आता कोरोनाकाळात लग्न शाही पद्धतीने होण्यावर बंधनं आले आहेत. अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. पण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचं लग्न अत्यंत साधेपणाने अवघ्या ४०-५० नातेवाईकांच्या उपस्थितीत लावलं आहे.
नरहरी झिरवाळ हे नेहमीच आपल्या साधेपणाची महाराष्ट्रात सर्वश्रुत असलेले नेते आहेत. त्यांचा मुलगा गोकुळ याचा विवाह करंजाळी येथील पदमकार गवळी यांची कन्या जयमाला हिच्यासोबत दिंडोरी तालुक्यातील करंजाळी येथे अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत पार पडला.
या विवाहाला कोणीही उपस्थित राहू नये व ऑनलाईन आशीर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २७००० लोकांनी या विवाहाला ऑनलाईन उपस्थिती लावली. यामध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश होता.
दरम्यान गोकुळ याचा हळदी समारंभ झिरवाळ यांच्या वनारे येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी नरहरी झिरवाळ यांनी कुटुंबीयांसमवेत ठेका धरला. त्यांनी पत्नी व नाती समवेत केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांचा साधेपणा सर्वाना प्रचंड भावला आहे.
बघा व्हिडीओ-
विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी विवाह सोहळ्यात धरला संबळवर ठेका pic.twitter.com/Np9KvmdsnI
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) July 2, 2020
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.